🔯मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत उद्यापन 🔯 🔯 MARGSHIRSH GURUWAR 🔯

🔯मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत उद्यापन 🔯

    मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत उद्यापन हे या वर्षी अमावस्या आणि कंकणाकृती सूर्यग्रहनाबरोबर एकत्र आले आहे. त्यामुळे काही महिलांच्या मनात एक शंका निर्माण झाली आहे ती अशी की अमावस्या दिवशी महालक्ष्मी व्रत उद्यापन करायचे की नाही … तर आपण याची सविस्तर माहिती खाली घेऊया … प्रथम पाहूया सूर्यग्रहणाची माहिती ….

       🌞 कंकणाकृती सूर्यग्रहण माहिती 🌞

    
       बुधवार दि. २५ डिसेंबर रोजी अमावस्या सकाळी ११.१७ वा. सुरु होते.व गुरुवार दि. २६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०.४२ वा.संपत आहे व महालक्ष्मी व्रत गुरुवार शेवटचा आहे. कंकणाकृती सूर्यग्रहण देखील आहे.
     
      ग्रहणाचे वेध बुधवारी २५/१२/२०१९ सुर्यास्तापासून बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी बुधवारी रात्री १२ पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत.


ग्रहण-स्पर्श = ८/०३/५९
  मध्य = ९/२१/४०
 मोक्ष= १०/५५/०२
[ वाजून/मिनिट/सेकंद ]

      साधारण सर्व गावांच्या स्पर्श-मध्य -मोक्ष वेगवेगळ्या वेळा पाहता ग्रहण दु. १२वा. च्या आत संपते आहे. याचा अर्थ अमावस्या आणि ग्रहण दुपारपर्यंत संपत आहे.

    आता प्रश्न असा आहे की, त्या दिवशी असे सर्व असताना महालक्ष्मी व्रत उद्यापन करावे का?


मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत उद्यापन     तर हो त्याच दिवशी व्रताचे उद्यापन करावे. दुपारनंतर पुजा करुन संध्याकाळी उद्यापन करण्यास काहीही हरकत नाही. यात वाईट होण्यासारखे काहीच नाही. बाधा कसलीही नाही. कोणीतरी उगाच मनाने काही प्रश्न निर्माण करुन गैरसमजूती समाजात पसरवू नयेत.


     माहिती जाणुन घेऊया, प्रत्येक मराठी महिन्यात सर्व तिथी असतात. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत (शुक्लपक्ष) आणि प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत (कृष्णपक्ष)
      
     ११ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा होईल तशी मार्गशीर्ष अमावस्या आहे.आणि अमावस्या चांगली नसते, वाईटच असते असे काहीही नाही.मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत उद्यापन
       
      गेल्या २-३ वर्षापासून पाहते आहे की, मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत उद्यापन नेमके अमावस्येदिवशी आले की, सर्व महिला काय करतात तर त्या दिवशी करत नाही आणि का तर “अमावस्या” आहे म्हणून. अगं,माझ्या सख्यानो तीसुध्दा त्या महिन्यातील एक तिथी आहे हे का नाही लक्षात घेत.      एक लक्षात घ्या, “दिवाळीतील लक्ष्मीपुजन”हे अमावस्येलाच असते. व लक्ष्मीपुजनाची वेळही अमावस्या काळातच दिलेली असते.त्यादिवशी आपण त्या दिलेल्या वेळेतच लक्ष्मीपुजन करतो. मग आता महालक्ष्मी व्रत उद्यापन जर अमावस्येदिवशी आले आहे. तर बिघडले कुठे?


     मी मला वाटलं म्हणून काहीतरी लिहिले असे मी मुळीच करत नाही. शास्त्राधारावरच माहिती लिहित असते.चांगल्या गोष्टींचा प्रसार करणे ही नैतिक जबाबदारी आहे. तेव्हा गोंधळून जाऊ नये.काही चुकीचे,गैरसमजूत करु नयेत. ज्या दिवशी उद्यापन आहे त्याचदिवशी करणे योग्य होय अमावस्या असली तरीही.
     मला माफ करा पण एक विचार करा, मी, आपण,कोणीही असो जर अमावस्ये दिवशी  जन्म झाला किंवा मृत्यू झाला तर तेव्हा आपण म्हणतो का हो ? आज नको आज अमावस्या आहे मी उद्या जन्म घेईन किंवा मला उद्या मृत्यू द्या. पावसाचेही तसेच आहे आज पडू नकोस उद्या पड असे आपल्या सांगण्यावर पाऊस येत नाही.  असे नाही ना होत, सर्वच गोष्टी आपल्या हातात नाही म्हणून ज्या दिवशी जे आहे ते निःसंकोचपणे करावे.
     
      महालक्ष्मी व्रत उद्यापन २६ डिसेंबर २०१९ रोजी दुपारपासून संध्याकाळपर्यंत पुजा, उद्यापन जरुर करु शकता. 

🌹**Manjiri Dhavan**🌹
           *Astrologer & Numerologist*

Leave a comment