💓फक्त एक छान मैत्रीण हवी 💓 (Just want a nice girl-friend )


💓 फक्त एक छान मैत्रीण हवी 💓


💓फक्त एक छान मैत्रीण हवी 💓  (Just want a nice girl-friend )पन्नाशी,साठ्ठीचीच स्त्री आता सर्वात तरुण असते.

अनुभवांच्या शिदोरी सकट बोल्डसुद्धा असते.


👩 छान मैत्रीण👩


कुरकुरणाऱ्या गुडघ्यांना ती 

सहज अॅडजेस्ट करते.

मुलांबरोबर लहान होते,

मुलीचीही मैत्रीण होते.


संसारात राहूनही स्वतःची स्पेस जपते.

गाणी, गोष्टी, मूव्ही, नाटक हवे तेव्हा बघते.


पन्नाशी, साठ्ठीची स्त्री सर्वात स्मार्ट म्हणणे काही  वावगं ठरणार नाही.


बाहेर जाण्यासाठी आता परवानगी लागत नाही.

लोक काय म्हणतील याची काळजी करत नाही.


सून आणि सासू आता डिस्कशन उरले नाही.


विमानाचे पंख लावून तिला जग फिरायचे असते.


अंगभर दागिन्यांना केव्हाच सुट्टी देते.

डायमंडचं मंगळसूत्र तेवढं दिमाखात मिरवते.


जगायचच राहून गेलेलं ती आता जगत असते.

पन्नाशी, साठ्ठीचीच स्त्री आता सर्वात तरुण असते. 


देवाला मी आज निवांत पाहीलं आणि लगेच एक फूल वाहिलं  


देवाने हसून म्हटलं “मागा, काय जे मनात साठलं.”


“देवा मला नको काही, कोऱ्या कागदावर सही घे “


“एक मिनिट, एक मिनिट … विचारलेच आहेस म्हणून मागतेय.


 💓-छानशी मैत्रीण- 💓

💓फक्त एक छान मैत्रीण हवी 💓  (Just want a nice girl-friend )एक छानशी मैत्रीण दे.

हवे तर अजुन एखादे फुल घे.


दिसायला छान नसली तरी चालेल.

पण बोलायला छान असायला हवी.


डोळे सुंदर नसले तरी चालेल,

पण नजरेतून बोलणारी हवी,


केस लांब नसले तरी चालेल,

पण सोबत लांब चालणारी हवी


माझ्या प्रत्येक दुःखात रडली नाही तरी चालेल,

फक्त माझ्या सुखात थोडे हसणारी हवी.


यातलेही काही कमी असेल तरी चालेल,

फक्त एक छान मैत्रीण हवी.


.. मैत्रीण ..

💓फक्त एक छान मैत्रीण हवी 💓  (Just want a nice girl-friend )


 

किती गोड असते हो आपल्या आयुष्यात एक मैत्रीण असणे,

कारण ती मैत्रीण नाही तर आपल्या प्रत्येक सुख दुःखामध्ये आपल्या सोबत असणारी आणि देवाने आपल्याला आधाररुपी दिलेली एक मागणी असते.

ती मैत्रीण नसते तर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी एक व्यक्ती असते.


पन्नाशी,साठीच्या स्त्रियाचें अगदी नेटकं वर्णन, खरेच पन्नाशी नंतर स्त्रियांना पंख फुटल्याचे जाणवते आहे,

मैत्रिणीबद्दल खुपच छान लिहीले. वाचून अगदी मन भरुन आले.

मैत्रिणीची पण आपल्या आयुष्यात एक वेगळीच भूमिका असते. तिच्या सोबतीने कुठल्याही वयात आयुष्याचा स्वच्छंदपणे आस्वाद घेता येतो. 


1 thought on “💓फक्त एक छान मैत्रीण हवी 💓 (Just want a nice girl-friend )”

Leave a comment