स्मिता पाटील’ एक बाजिंदी मनमानी… ( Smita Patil ‘A Bajindi Manmani )

💜 एक बाजिंदी मनमानी …..💜

स्मिता पाटील' एक बाजिंदी मनमानी... ( Smita Patil 'A Bajindi Manmani )स्मिता…. एक बाजींदी मनमानी…… आपल्या जबरदस्त ताकदीच्या अभिनयाने आणि रसरशीत चैतन्यशाली व्यक्तिमत्वाने अगदी अल्पजीवी ठरलेली कारकिर्दही लख्ख झगझगीत करून गेलेली स्मिता ही केवळ पडद्यावरची एक नटी नाही. समस्त मराठी जणांच्या मनात ठाण मांडून बसलेली ती एक दंतकथा आहे. इतक्या वेग वेगळ्या ताकदीच्या भूमिका तिने केल्यात त्याला तोड नाही…

दोस्तहो… या लेखाचा शीर्षक मी स्मिता पाटील ‘एक बाजिंदी मनमानी’ …असं दिला आहे, त्याच कारणं ही तसं आहे, स्मिता आयुष्यभर विजगुष वृत्तीने जगली ‘जैत रे जैत’ मध्यल्या ‘चिंधी’सारखी बिनधास्त होती. ती एक स्वतंत्र विचाराची स्त्री होती, तिचा पेहराव नेहमी जीन्स पॅन्ट शर्ट मध्ये असायचा. तिचा न्यूज रीडर म्हणून प्रवास असाच ऍकसिडेंटलं होता, ती पूर्वी एक खेळाडू होती, पण एका आजाराने ती पार कोसळू गेली आणि डिप्रेशनमध्ये गेली पण तिच्या बहिणीने तीच मन रमवण्या साठी दूरदर्शनवर न्यूज रीडर म्हणून ऑडिशन देण्यास सांगितले आणि न्यूज रीडर झाल्यावर ती डिप्रेशन मधून बाहेर आली आणि तिने मीडिया आणि सिनेमाच्या एका वेगळ्या जगात प्रवेश केला. असं म्हणतात की जीन्स पॅन्ट घालणाऱ्या मॉर्डन लूक असणाऱ्या या युवतीनं न्यूजरीड करताना आपल्या शर्टावर नुसती साडी लपेटून ही एकदा न्यूज दिली आहे. पण ह्या आधुनिक स्त्री ला आजूबाजूच्या जगाचं चांगलं भान होत आणि उर्वरीत आयुष्यही ती एक भारतीय स्त्री म्हणून आपली इमेज जगली. ‘नमक हराम’ मधलं गाणं’ आज रपट जाये तो ‘हे अमिताभ बरोबर पावसातलं रोमँटिक सॉंग करताना ती चित्रिकरण करत असताना भरभरून रडली, कारण हे नव्हतं की ती एक कमर्शिल सिनेमा करत होती किंवा अमिताभ समोर होता, कारण हे होतं की या पूर्वी साडी घालून ती पावसात कधी भिजली नव्हती कदाचित आपल्या पावसात असं भिजण्याच्या इच्छापूर्तीचा भावनाआवेश तिला आवरला नसेल.

नभं उतरु आलं…..


स्मिता पाटील' एक बाजिंदी मनमानी... ( Smita Patil 'A Bajindi Manmani )  हेही वाचा 👉शास्त्रज्ञ टेसी थोमस ” मिसाईल वुमन “


जणू या पावसात भिजल्यावर ना.धो. महानोर म्हणतात तसं….


नभं उतरु आलं,

 चिंब थरथर वलं,

 अंग झिम्माड झालं,

  वल्या पान्यात पारा,

 एक गगन धरा,

 तसा तुझा उबारा,

 सोडून रितभात… 


अमिताभने तिला त्या वेळेस धीर दिला आणि तो सीन व्यवस्थित पार पाडला. अशी होती स्मिता… एक बाजींदी…… तिने आपल्या भूमिकेतून आपली बंडखोर इमेज दाखवली जगवली… ( स्मिताच्या मैत्रिणी तिला ‘स्मि’ म्हणायचे )

‘मंथन ‘मधली बिंदूची भूमिका आठवते… स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार साकारला होता. ‘मिर्च मसाला’ मध्ये सूभेदार च्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून आपल्या रक्षा करणाऱ्या महिलांन बरोबरची करारी ‘सोनबाई’, त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित ‘भूमिका ‘ मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणार्‍या स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या. ‘अर्थ ‘मधील कविता सन्याल, ‘शक्ती’ मधली रोमा देवी, ”उंबरठा’ मधील जबरदस्त रोल मधली सुलभा महाजन, चक्र मधील अम्मा, आणि ‘जैत रे जैत’ मधली दारुड्या नवऱ्याला काडी मोड देऊन ढोलीया बरोबर जाणारी बाजींदी चिंधी, नमक हलाल मधली “आज रपट जाये तो” या रोमँटिक पावसातील गाण्यातील स्मिता, बाजार मधली शायर सलिमला जड अंतकरणाने (नसरुद्दीन शाहला) आपल्या आयुष्यातून निघून जा सांगणारी नजमा, आणि कमर्शिअल चित्रपट ‘कसम पैदा करनेवाले की’, ‘डांस डांस’ मधली वेगळी भूमिका असलेली राधा… स्मिता ने कोणता रोल केला नाही, सर्वप्रकारच्या भूमिकेत अगदी झोकून दिलेला अभिनय मग तो ‘अमृत’ मधला राजेश खन्ना सोबत म्हाताऱ्या कमला देवीचा रोल असो की ‘मंडी’ मधल्या षोडश वर्षीय वेश्या जीनतचा, स्मिता पाटील सगळ्या रोल जगली. दलित, शोषित स्त्रियांच्या, बंडखोर स्त्रियांच्या, आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. स्मिताने प्रेयसीच्या रुढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या. वेगळया मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणार्‍या अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली.


💙स्मिता पाटील💙


स्मिता पाटील' एक बाजिंदी मनमानी... ( Smita Patil 'A Bajindi Manmani )रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील हिचं चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. अल्पायुषी अभिनय कारकिर्दीत स्मिता पाटीलने विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या.

राज बब्बर बरोबरच्या (राज बब्बर हा विषय न बोललेला बरा..आमच्या सारख्या स्मिता दर्दी प्रेक्षकाना त्रास होतो.) पण तरीही तिनं लोकांचा रोष कुटुंबाचा विरोध पत्करून राज बब्बर बरोबर लग्न केलं त्या वेळेस ‘अर्थ’ सिनेमा मध्ये ज्या प्रमाणे स्मिताचा रोल होता तसंच काही तरी तिच्या आयुष्यात घडलं.

येथे राज आणि स्मिता बद्दल नेहमीच तिच्या चाहत्यांना प्रश्न पडतो, स्मिताने एका विवाहित पुरुष का निवडला ?

राज बब्बर ह्याच त्यावेळेस नादिरा बब्बर बरोबर लग्न झालं होतं त्यावेळेस त्याच एक पूर्ण कुटुंब होत.

मला येथे वपु काळेचं एक वाक्य आठवतं.

“माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत.

जिला मनातली सगळी स्पंदनं समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते.

आयुष्यातली ही मोठी गरज नियतीने भागवल्यावर माणसाचं समाधान व्हायला हवं. पण नाही.

एकमेकांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे, हे आणखीन कुणाला तरी समजावं असं वाटतं. असं का?

-ह्याला उत्तर नाही.”


लग्नानंतर ‘प्रतिकच्या’ प्रसूतीच्या वेळी अचानक स्वास्थ्य बिघडून १३ डिसेंबर, १९८६ रोजी, वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी या सर्जनशील अभिनेत्रीचं निधन झालं. तिच्या मृत्यूनंतर ही तिच्या इच्छेनुसार तिला मेकअप करून मृत्यूशय्ये वर ठेवलं गेलं, मृत्यूनंतरही मास्को, न्यूर्यॉक , फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचं ‘सिंहावलोकन’ झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली. 


मराठी जगताचा एक हळवा मानबिंदु


तिच्या सहवासात आलेली माणसं जशी या मनास्विनिने झपाटून टाकली, तसाच तिच्या सिनेमातून तिचा सहवास लाभलेला हरएक प्रेक्षक आजही झपाटला जातो. तीच नाव घेताच मराठी माणसाचा उर एकीकडे अभिमानाने भरून येतो आणि दुसरीकडे डोळ्यांत टचकन पाणीही येतं ………… जगाच्या पाठीवर जोपर्यंत कुठेना कुठे मराठी माणुस असेल, तोपर्यंत त्याच्या मनात स्मिताही जीवंत असेल…………… ती मराठी जगताचा एक हळवा मानबिंदु बनली आहे….

बाजार मधला एक सीन आठवतो, तेथे नजमाला (स्मिता), सलिम (नसरुद्दीन शाह) म्हणतो; “तू मला माझ्याआयुष्यातून निघून जा म्हणतेस” पण; मला कधी भेटशील तर ओळख दाखवशील ना? “तुला माझी आठवण येईल ना”?

म्हणूनच स्मिता तुझी आठवण ही येतच राहणार…

होय, तुझी आठवण ही येतच राहणार….

तुला आम्ही कसे विसरणार…

तुझ्या सुंदर चित्रातून,

 भूमिकेतून तू आम्हाला नेहमी भेटत राहशील…


हम कबूल करते है!

 हमे फुरसत नहीं मिलती!

मगर ये जरा सोचो, 

तुम्हे जब याद करते है,

जमाना भूल जाते है….


फिल्म बाजार मधलं हे गीत स्मिता तुझ्या साठी…


करोगे याद तो, हर बात याद आयेगी , 

गुज़रते वक़्त की, हर मौज ठहर जायेगी , 

करोगे याद तो …

 ये चाँद बीते ज़मानों का आईना होगा, 

भटकते अब्र में, चहरा कोई बना होगा,

 उदास राह कोई दास्तां सुनाएगी… 

करोगे याद तो..

गली के मोड़ पे, सूना सा कोई दरवाज़ा ,

तरसती आँखों से रस्ता किसी का देखेगा,

 निगाह दूर तलक जा के लौट आएगी ..

करोगे याद तो. 


स्मिताचा आज स्मृतीदिन त्यानिमित्ताने स्मृती जाग्या झाल्या. विनम्र अभिवादन…!

🙏🏻🙏🏻🙏🏻

Leave a comment