विश्वास आणि श्रध्दा…
एका व्यक्तीने दोन उंच टॉवर वर बांधलेल्या दोरीवर चालायला सुरुवात केली. हातात काठी तोलून हळू हळू तो चालत होता. त्याचा मुलगा खांद्यावर बसला होता !
मैदानातून प्रत्येकजण श्वास रोखून त्याला पहात होता आणि त्यांना तो खूप तणावग्रस्त वाटत होता.
जेव्हा तो हळूहळू दुसऱ्या टॉवरवर पोहोचला तेव्हा प्रत्येकाने टाळ्यांचा कडकडाट करून त्याचे स्वागत केले.
त्यांनी हात हलवून त्याचे सोबत सेल्फी देखील काढले.
त्याने जमावाला विचारले “तुम्हाला आता असं वाटतं का, की मी त्याच दोरीवरुन आता उलट दिशेने पलिकडे जाऊ शकेन?”
गर्दीने एका आवाजात उत्तर दिले “हो. होय, तुम्ही हे करू शकता!”
त्याने पुन्हा त्यांना विचारले, “आपल्या सर्वांचा माझ्यावर विश्वास आहे का?
ते म्हणाले, “होय, आम्ही तुमच्यावर पैज लावण्यास तयार आहोत”.
तो म्हणाला, “ठीक आहे, मग तुमच्यातील कुणी एक माझ्या खांद्यावर बसू शकेल काय? मी त्याला सुरक्षितपणे दुसर्या बाजूला घेऊन जाईन !
आणि तेथे स्तब्ध शांतता पसरली.
श्रद्धा वेगळी आहे आणि विश्वास वेगळा आहे. श्रद्धे साठी तुम्हाला संपूर्ण पणे शरणागत होणे आवश्यक आहे !!
या घडीला आपल्याकडे याचीच कमतरता आहे !
आम्ही देवावर विश्वास ठेवतो पण आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवतो का?
पुन्हा पुन्हा विचार करण्यासारखा खूप सुंदर संदेश आहे….