हे वातींचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का?

🎆 वातींचे प्रकार 🎆

हे वातींचे प्रकार तुम्हाला माहीत आहेत का?सगळ्यांच्या आग्रहाखातर काही मला माहिती असलेले वातीचे प्रकार..

*नंदादीप वात*

— समई वात तेलाच्या दिव्यासाठी ही 5,7,9 पदरी असते शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी
असते.. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात..

*बेलवात*

— ह्या श्रावण महिनाभर लावतात– एकाला जोडून एक अश्या 3 वाती करतात (4+4+3
पदरी) टोटल 11 पदर.. ह्या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात कोणी फक्त सोमवारी
लावतात…

*शिवरात्रवात*

— महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात..

*वैकुंठवात*

–350 पदरी आपल्या हाताची वितभर( करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले अंतर)
करायची ती वैकुठंचतुर्दशी ला लावतात.. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर
गुंडाळतात..

*टिपूर*

–तीन पदराच्या जोडून (365 +365) जोडवाती म्हणतात त्या त्रिपुरारी
पौर्णिमेला लावतात..

*अधिक महिन्याची वात*

— 33 पदरी 33 वाती, 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात.. कोणी महिनाभर लावतात
कोणी एकदाच लावतात..

*कार्तिक महिन्याची वात*

–कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत* 3 पदरी 105 वाती लावतात..
कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात..

*काडवाती*

— अंबाडीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळून आमच्याकडे गणपतीला आरती करतात
प्रत्येकाच्या हातात एक ,एक..

*श्रावणा*

— रोज महिनाभर 11 पदराच्या 11 वाती लावतात..

*फुलवाती*

— ह्या निरंजनात रोज लावतो आरतीच्या वेळी…

वातींचे प्रकार

*अनंतवात*

 –ह्यामधे एक वशाची एक वात, दोन वशाच्या दोन वाती, तीन वशाच्या तीन
असे 108 वशाच्या 108 वाती करतात व तुपात भिजवून श्रीकृष्णाला
ओवाळतात. 

*देहवात*

 –आपल्या डोक्यावर टाळुपासून ते पायाच्या अंगठ्या पर्यंत ची उंची
मोजून घेऊन तेवढ्या लांबीची 108 किंवा 365 पदरी वात करतात व ती तेलात भिजवून
ज्याच्या मापाची केलीय त्या व्यक्तीने लावायची असते.

*ब्रम्हांडवात* 

–आपल्या कपाळावर कुंकू लावतो त्या जागेपासून पुर्ण डोक्याला फेर घेऊन ते
मोजून तेवढ्या लांबीची 250 पदरी वात बनवतात व ज्याच्या मापाची आहे त्यांचे
हातून तीळ तेलात भिजवून लावतात 

*काकडा*

— कपड्याचे बारीक बारीक तुकडे करून त्याच्या वाती करून काकड आरतीला
लावायच्या.. 

रथसप्तमीला – 7 पदरी

कृष्णाला – 8 पदरी

रामनवमीला – 9 पदरी 

दशावतारीवात विष्णूला – 10 पदरी

शंकराला – 11 पदरी

सूर्याला – 12 पदरी

वैकुंठ चतुर्दशीला – 14 पदरी

गणपतीला – 21 पदरी

वातींचे प्रकार

 

हे सगळे वर्षभर करायचे असेल नेम म्हणून तर त्या त्या दिवसापासून परत त्या
दिवसापर्यंत व्रत करतात करणारे.. जसे रथसप्तमी ते रथसप्तमी.. गोकुळष्टमी ते
गोकुळाष्टमी..

 वरील सगळ्या वाती वसा काढूनच करतात .. आणि जितकी पदरी पाहिजे तितके पदर
गुंडाळायचे.. फक्त जोडवाती म्हणजे एकाला एक दोन वाती जोडायच्या म्हणजे एक
पूर्ण झाली की न तोडता दुसरी करायची.. 3 पदरी असते ही वात.. 3+3 पदर..

 बेलवाती पण एकाला एक जोडून 3 वाती.. 4,4,3 पदरी ..

 🙏धन्यवाद 🙏

Leave a comment