यम द्वितीया – भाऊबीज [इसवी सन २०१९ : २९ ॲाक्टोबर]

|| सुमंगल सुप्रभात || 
             || वंदे मातरम् ||
                दिन विशेष
भाऊबीजइसवी सन २०१९ : २९ ॲाक्टोबर

शालिवाहन शक १९४१,(विक्रम संवत २०७७) 
संवत्सर नाम : विकारी
अयन : दक्षिणायन
ऋतु : शरद
मास(महिना) : कार्तिक
पक्ष: शुक्लपक्ष
तिथी : द्वितीया
वार : मंगळवार 
चंद्रनक्षत्र : विशाखा
चंद्रराशी :  तूळ – वृश्चिक
सूर्यराशी : तूळ
राहूकाळ : १५:३८ ते १७:०२
सुर्योदय : सकाळी ०६:३७
सूर्यास्त : सायं. ०६:०७


यम द्वितीया – भाऊबीज

जागतिक स्ट्रोक दिन


१८९४: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना.
१९६१: संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.
१९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
१९९६: स्वदेशात बनविलेली कामिनी ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्‍कम येथे कार्यान्वित करण्यात आली.
२००८: डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.


           *।। दास-वाणी ।। *


केशव नारायण माधवमूर्ती । 
गोविंदविष्णूमदसूदनमूर्ती । 
त्रिविक्रमवामनश्रीधरमूर्ती । 
ऋषीकेश पद्मनाभि  ।। 


।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
    दासबोध : ०४/०५/१० 


अर्चनभक्तीमधे भगवंताच्या विविध सगुण मूर्तींचे मनोभावे पूजन करावे. 
ज्याला काही रंग रूप किंवा आकार आहे ते सगुण.
केशव, नारायण ही विष्णूची रूपे आहेत.
मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती.
लक्ष्मीपती हे ही विष्णूचेच नाव.
गो म्हणजे गायी. गो म्हणजे इंद्रीये.
या दोन्हींची जाण आहे तो गोविंदही विष्णूच.
विष्णू म्हणजे व्यापकता.
सर्वव्यापी, सर्वांचा पालनकर्ता तो विष्णू.
स्थिती म्हणजे जो देहाला टिकवतो तो विष्णू. 
मधु नामक दैत्याला मारून टाकतो तो मधुसूदन.
त्रिविक्रम हे ही विष्णूचेच नाम.


बळीला पाताळात लोटणारा बटु वामन अवतार.
श्री म्हणजे लक्ष्मी. धर म्हणजे धारण करतो तो.
श्रीधर म्हणजेदेखील विष्णू.
ऋषिक् म्हणजे इंद्रिये. ईश म्हणजे स्वामी.
इंद्रिये ज्याच्या ताब्यात आहेत तो ऋषिकेशही विष्णूच.
पद्म म्हणजे कमळ. नाभी म्हणजे बेंबी.
पद्म आहे नाभी ज्याच्या तो पद्मनाभ.
अशा भगवान विष्णूंच्या असंख्य मूर्तींचे 
मनोभावे सतत पूजन करणे ही नवविधा भक्तीमधील पाचवी अर्चनभक्ती होय.


अर्चनभक्ती समास.


श्रीराम जय राम जय जय राम


  ⭐⭐ शुभ दीपावली ⭐⭐


        * आपल्याला आणि आपल्या परिवाराला ही दिवाळी आनंदाची, सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.* 


दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a comment