मराठी प्रेरणादायी सुविचार (Marathi motivational quotes)

🕮⮞मराठी प्रेरणादायी सुविचार⮜🕮मराठी प्रेरणादायी सुविचार
➤ एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.


हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे
व ती
पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!


शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा.
क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.


केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं
आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.


चिंता ही कुठल्याच दुःखावरचा
उपाय होऊ
शकत नाही.


तलवारीच्या जोरावर मिळवलेलं
राज्य
तलवार असेतोवरच टिकतं.


जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत:
झीजा आणि इतरांना गंध द्या.


आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून,
वाचून,
बघून समजत नाही.


मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की
शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.हेही वाचा – 70 “इंग्रजी सुविचार” 


मराठी अर्थासहीत..
मोहाचा पहिला क्षण,
ही पापाची पहिली
पायरी असते.


जगात सारी सोंगे करता येतात,
पण पैशाच
सोंग करता येत नाही.


प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,
पण शत्रू निर्माण करू नका.


Marathi motivational quotes

मराठी प्रेरणादायी सुविचारसंयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा
गुण आहे.


ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.


दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे
आणि एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत
बसणे हे त्याहून बरे.


आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी
आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची
तसदी घ्यावी लागते.


बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम
निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची
जागा घ्यावी.


चांगले काम करायचे मनात
आले की ते
लगेच करून टाका.


भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.


संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.


Marathi motivational quotes


तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही
म्हणून निराश होऊ नका ;
कदाचित
त्याने तूमचे चांगले होणार नसेल.


केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.


लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
तोंडावर ओढुन घ्यावी तर
लगेच खाली
पाय उघडे पडतात.


झाडासारखे जगा, खूप उंच व्हा.
पण जीवन
देणाऱ्या मातीला विसरू नका.


शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका
आणि जर
का घेतले तर
त्या व्यक्तीलाही तशीच मदत
करा.


अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं
हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.


ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात
तो
कधीही एकटा नसतो.


बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !


आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या,
पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.


💙मराठी प्रेरणादायी सुविचार नक्की वाचा आणि आमलात आणा .💜

Leave a comment