बदाम — एक नैसर्गिक अँटी एजिंग पदार्थ. (Almonds – A natural anti-aging substance.)

💙 बदाम – एक नैसर्गिक अँटी एजिंग पदार्थ 💛

⏩कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात. बदाम भिजवून खाणे फारच फायदेशीर ठरतात. बदाम भिजवल्यानंतर नरम होतात आणि पचण्यास सोईस्कर असतात.

बदाम -- एक नैसर्गिक अँटी एजिंग पदार्थ. (Almonds - A natural anti-aging substance.)
त्वचेच्या सुरकुत्या दूर होतात- त्वचेच्या सुरकुत्या दूर करण्यासाठी इतर कोणत्याही गोष्टींचा वापर करण्याऐवजी भिजवलेले बदाम खाणे श्रेयस्कर. हे एक नैसर्गिक अँटी एजिंग पदार्थ आहे.


सकाळी भिजवलेल्या बदामाचे सेवन केल्यास चेहर्यारवर सुरकुत्या पडत नाहीत आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते. मधुमेही व्यक्तींना बदाम खाल्ल्याने त्यांचे शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहते.


 नैसर्गिक अँटी एजिंग पदार्थ


भिजवलेले बदाम सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या भेडसावत नाही. कारण बदामामध्ये खूप अधिक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट व्यवस्थित साफ होते.


बदामाची साल कोरडी असते. त्यामुळे ती काढून टाकण्याकडे लोकांचा कल असतो. परंतु त्याच्यात रक्त वाढवण्याची ताकद असते. तेव्हा बदामाचे बी त्याच्या सालीसहीत खाल्ले पाहिजे.

👉जाणून घ्या डाळिंब का खावे.. [ Learn why you should eat pomegranate ]


वजन कमी करण्यासाठी आहारात भिजवलेले बदाम अवश्य सामील करा. त्यामुळे खूप वेळ भूक लागणार नाही. त्यामुळे वजन सहजपणे कमी होण्यास मदत होईल.


भिजवलेल्या बदामांमध्ये प्री बायोटेक गुण असतात. त्यामुळे प्रतिकारक्षमता मजबूत होण्यास मदत मिळते. प्री -बायोटिक गुण असल्याने आतड्यांमध्ये असणारे चांगले जीवाणू वाढतात त्यामुळे आतड्यांवर परिणाम करू शकणारा कोणताही आजार होत नाही.

बदाम -- एक नैसर्गिक अँटी एजिंग पदार्थ. (Almonds - A natural anti-aging substance.)


👉रक्त शुध्दीकरण


बदामाचा दुसरा फायदा म्हणजे बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुध्दीकरण करण्यास उपयुक्त ठरते. बदामाच्या सेवनाने केस गळण्याचे प्रमाण कमी होते.


बदामात असलेले फॉस्फरस हाडे आणि दातांना बळकट बनवते. तसेच हाड आणि दातांशी संबंधित आजार होण्याचा धोकासुद्धा कमी होतो. दातांसाठी आवश्यक असणारे फॉस्फरस बदामातून पुरेशा प्रमाणात मिळते.


कोरडी त्वचा असणार्यांेना त्वचेचा स्निग्धपणा वाढवण्यास मदत होते. भिजवलेल्या बदामामध्ये पोटॅशिअम आणि कमी प्रमाणात सोडियम असल्यामुळे रक्तरदाबासह हृदयाशी निगडित समस्या नियंत्रणात येतात. त्यातील मॅग्नेशिअममुळे रक्त प्रवाह योग्य राहतो.

Leave a comment