तर तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! ! ( Happy Children’s Day ! ! )

👶 तर तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! ! 👶


तर तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! ! ( Happy Children's Day ! ! )


रस्त्याने चालताना दगड दिसला , पायानी भिरकवत तो दूर न्यावासा वाटला , तर तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! !


आईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची इच्छा झाली , तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! !


हेही वाचा – प्रेमाची ताकद ( power of “LOVE” )


पाऊस पडतोय , पावसात गाऱ्या -गाऱ्या भिन्गोऱ्या करायची इच्छा झाली , पावसाचे तुषार वर उडवायची इच्छा झाली , तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! !


तर तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! ! ( Happy Children's Day ! ! )रस्त्यात मैत्रीण पाठमोरी दिसली , मागून जाऊन तिच्या खांद्यांना पकडून ”भॉ ssss क ” करायची इच्छा झाली तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! !


कोणाचा तरी तळपाय उघडा दिसला , गुदगुल्या करायची इच्छा झाली तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! !

आणि …


👼 बाल दिनाच्या शुभेच्छा ! ! 👼


काही दिवस ‘कट्टी’ झाल्यावर ‘बट्टी’ घ्यायची तीव्र इच्छा झाली तरच तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! ! !


अशा कितीतरी छोट्या -छोट्या गमती -जमती विसरत आपण आयुष्य जगायचे कसे तेच विसरलो आहोत !


आपल्यातल्या खोडकर , व्रात्य , हसऱ्या बालमनाला आज साद घालूया.. द्या टाळी ! ! !


Leave a comment