चाळीस वर्षांपूर्वी – आहे की नाही मजेशीर (Isn’t that funny)

😊 आहे की नाही मजेशीर 😊


चाळीस वर्षांपूर्वी - आहे की नाही मजेशीर🌞चाळीस वर्षांपूर्वी🌞


🍃चाळीस वर्षांपूर्वी मुले पालकांशी अदबीने आणि आदराने वागायची. आता पालकांना मुलांशी आदराने वागावे लागते.


🍃 चाळीस वर्षांपूर्वी प्रत्येकाला मुले हवी असायची, आता अनेकांना मुले असण्याची भिती वाटते.


🍃 चाळीस वर्षांपूर्वी लग्ने सहज व्हायची आणि घटस्फोट मिळणे अवघड होते.आता लग्न जमणे अवघड झाले आहे आणि घटस्फोट मिळणे सोपे बनले आहे.


चाळीस वर्षांपूर्वी - आहे की नाही मजेशीर🍃 चाळीस वर्षांपूर्वी लोकांना कष्ट करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून भरपूर खावे लागायचे, आता कोलेस्टेरॉल आणि कॅलरीज च्या भीतीने लोक खायला घाबरतात.


हेही वाचा – ” ती ” आहे म्हणून.


🍃 चाळीस वर्षांपूर्वी खेडेगावातील लोक नोकरीच्या शोधात शहरात यायचे. आता शहरातील लोक ताणतणावातून मुक्ती आणि शांततेच्या शोधात खेडेगावात जातात.


🍃 चाळीस वर्षांपूर्वी खात्यापित्या घरातील दिसण्यासाठी धडधाकट दिसावे यासाठी प्रयत्न करायचे.आता लोक तंदुरुस्त दिसण्यासाठी डायट करतात.


🍃 चाळीस वर्षांपूर्वी श्रीमंत व्यक्ती आपण गरीब असल्याचे दाखवण्यासाठी धडपडत असत.आता गरीब व्यक्ती आपण श्रीमंत असल्याचे भासवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.


🍃 चाळीस वर्षांपूर्वी एक व्यक्ती सगळ्या कुटूंबाचा चरितार्थ चालवत असे. आता कुटूंबातील एका मुलासाठी सगळे नोकरी व्यवसाय करत असतात.


🍃 चाळीस वर्षांपूर्वी संवाद साधण्यासाठी साधन नव्हते. आता संवादासाठी वेळ नाही.. माणसे नाहीत.


चाळीस वर्षांपूर्वी - आहे की नाही मजेशीर
 प्रगती म्हणावी का अधोगती ह्या गोष्टींना..??

 कुठे आणि कसे पोहोचलो आपण….??


🌞 आहे ना कीती छान 🌞

Leave a comment