कोरोनाचा संसर्ग टाळण्याचा एकच आणि एकच उपाय … To prevent corona infection…

The only and only solution to prevent corona infection…

coronavirus 4844593 1280

कोरोनाचा संसर्ग टाळण्याचा एकच आणि एकच उपाय आहे तो म्हणजे आपल्या हाताला नाक, डोळे आणि तोंड या तिन्ही अवयवांना स्पर्श करण्यापासून रोखणे. कारण हा विषाणू केवळ हाताद्वारेच या अवयावातुन शरीरात प्रवेश करतो. इतकीच खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल.

    कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावण्याची आवश्यकता आहे काय? तर याचं उत्तर नाही असे आहे. मास्कचा वापर केवळ ज्यांना सर्दी, खोकला आहे त्यांनी करावा किंवा खोकला किंवा शिंक येत असेल तर तोंडा समोर साधा हातरुमाल लावला तरी देखील चालेल. मास्क तोंडावर लावला असला तरी आपल्या हाताचा स्पर्श डोळ्यांना होण्याची शक्यता असते. शिवाय मास्क अनेक वेळा काढताना घालताना आपल्या हाताचा स्पर्श अनेक वेळा नाकाला व तोंडाला होतंच असतो. त्यामुळे मास्क घातल्याने बरेच जन आपण सुरक्षित आहोत असे समजत असले तरी तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहातच असा याचा अर्थ होत नाही. 

       यापुढे आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बाहेरून घरी येतो तेव्हा सर्वात अगोदर करावयाची गोष्ट म्हणजे आपल्या अंगावरील कपडे इतरत्र न टाकता सरळ खुंटीवर टांगून द्यावेत व आपले हात साबणाने कमीत कमी 20 सेकंदा पर्यंत स्वछ धुवून घ्यावेत. त्यानंतरच इतर वस्तुंना स्पर्श करावा. कपड्यावरील विषाणू जास्तीत जास्त 12 तासा पर्यंतच जिवंत राहू शकतात त्यामुळे त्याच्यानंतर आपले कपडे आपण धुण्यासाठी टाकले तरी त्यातून काही धोका निर्माण होणार नाही. 

हात मिळवणे व गळ्यात भेटणे या 2 गोष्टी टाळल्या तरी देखील याचा संसर्ग रोखण्यास बरीच मदत होऊ शकते.


      काही अफवा….👇👇👇👇  •  1) – लवंग खाल्ल्याने कोरोना होत नाही? तर याचं उत्तर नाही असे आहे.  • 2) – गरम पाण्याने अंघोळ केली तर शरीरावरील विषाणू मरतात? तर याचं उत्तर नाही असे आहे.  • 3) – उष्ण तापमानात विषाणू जास्त काळ टिकत नाहीत ? तर अद्याप याची पुष्टी करण्यात आलेली नाही.  • 4) – गोमूत्र पिल्याने कोरोना होत नाही? तर याचं उत्तर नाही असे आहे.कोणत्याही अफवा किंवा व्हाट्सअप यूनिव्हर्सीटी वरील कुठल्याही मेसेज वर विश्वास ठेवू नका. कसलाही संशय असेल तर जवळच्या डॉक्टरांना किंवा शासनाने दिलेल्या हेल्प लाईन वर फोन करून त्याची खात्री करून घ्या.


images%2B%25286%2529आपल्या हाताचा तोंड, नाक, डोळे या भागांना स्पर्श न करणे व आपले हात साबणाने किंवा सॅनेटाइजर ने स्वछ धुणे हेच खबरदारीचे उपाय आहेत. या आणि अशा काही सूचना दररोज प्रत्येक व्यक्तीने नियम म्हणून अधिक जबाबदारीने पाळावेत व इतरांना देखील यासाठी प्रवृत्त करावे.


सदर माहिति डॉ. तात्याराव लहाने यांच्या न्यूज 18 लोकमत न्यूज चॅनेल वरील कार्यक्रमातुन घेतली आहे. 

आणखी एक महत्त्वाची गोष्ट…*दाढी*मित्रांनो काही दिवस आपली *दाढी* शक्यतो घरीच करा,कारण न्हाव्या कडील नॅपकिन पूर्णतः निर्जंतकीकरण केलेली नसते, शिवाय दिवसातून किमान एका नॅपकिन ने 20 ग्राहकांचे   तोंड साफ केल्या जाते,आता विचार करा दिवसभरातून किती प्रकारचे लोक दाढी करतात…त्यात एक जरी ग्राहक बाधित असला तर….मला तर विचार करूनच अंगावर शहारा येतो!!! बाकी आपण समजदार आहोत..ज्यांना घरी शक्यच नाही झाले तर कमीत कमी त्या न्हाव्याला पेपर नॅपकिन वापरायला भाग पाडले पाहिजे. कारण काही काही न्हावी तर चक्क आठवड्यातून फक्त एक वेळा दाढी कटिंग चे कपडे वॉश करतात. (माफ करा मला कुणाला वैयतिक दुखवायचं हेतू नाही) म्हणजे एक नॅपकिन कमीत कमी 140 लोकांच्या चेहरा, नाक तोंड, साफ  करते. विषय फार गंभीर आहे. मला कमाल वाटते की हया गोष्टी कडे अजून कुणाचे लक्ष कसे नाही गेले ते … वरील विषय सावधगिरी चा भाग म्हणून share करतोय…तरी सावध रहा.. आणि आपली प्रतिक्रिया काय आहे ते नक्की कळवा. 


🙏🙏🙏🙏
धन्यवाद…

Leave a comment