आनंदी राहा… आनंदात जगा …!!

आनंदी राहा… आनंदात जगा …!!

आनंदी राहा आनंदात जगा..

तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का ??? एका स्त्री चे अफलातून उत्तर !!!
एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारले ,
” तुमचा नवरा,
तुम्हांला आनंदात ठेवतो का ? ”


तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले . तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला . त्याला पूर्ण खात्री होती , की ती ” होच ” असंच म्हणेल . कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच काहीही तक्रार केलेली नव्हती …. !!


पण त्याच्या बायकोने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं , ” नाही ”
ती म्हणाली , ” माझा नवरा, नाही ठेवत मला आनंदात !! ”


वक्त्याने विचारले,
” म्हणजे काय, ते तुम्हाला बाहेर फिरायला, हॉटेलमध्ये जेवायला नाही नेत का ?… कधीतरी सरप्राईज, एखादी भेटवस्तू देऊन आनंदात, नाही ठेवत का ?


तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं. कारण इतकी वर्षे, हे सर्व तो तर, कुवतीप्रमाणे आणि योग्य त्या त्या वेळी करत आला होता. त्याला कळजीने घाम फुटला.


तेवढ्यात त्याची पत्नी पुढे म्हणाली , ” मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही , मी स्वत:च आनंदात राहते ….!! ”


” मी आनंदी असावं की नाही याच्याशी, त्याचा काहीच संबंध नाही . माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे . ”“कुठल्याही परिस्थितीत, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते . जर माझा आनंद, कुणा दुसऱ्यावर , एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला, तर ते माझ्यासाठीच कठीण होऊन बसेल .”


” कारण आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते .… !! माणसं , संबंध , आपलं शरीर , हवामान , आपले ऑफिसातले बॉस , सहकारी मित्र ,आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य .… !! ही यादी न संपणारी आहे .”


” त्यामुळे काहीही झालं तरी आपण आनंदी राहायचं हे मीच ठरवायला हवं ना …. ? माझ्याकडे खूप काही असलं काय किंवा काहीच नसलं काय , मी आनंदीच असते …. !! ”


” मला कुठे बाहेर जायला मिळालं काय किंवा घरात बसून राहावं लागलं काय , मी आनंदीच राहीन …. !! ”


मी श्रीमंत असले काय किंवा गरीब राहिले काय , मी आनंदीच असेन… !!”


आणि अजून एक, आम्ही दोघांनी प्रेमाने एकमेकांना स्वीकारलं आहे, त्यामुळे असले व्यवहार आम्ही कधीच आमच्यामधे नाही आणले. कारण जर का ह्यांनी बाहेर जेवायला नेले, फिरायला घेऊन गेले किंवा एखादा दागिना आणला, म्हणून जर का मी आनंदी होत असेल… तर हे काही ठिक नाही. हा शुद्ध एक जर-तरचा व्यवहार होईल. त्यात प्रेम नसेल. मी नेहमी आनंदी राहुन, त्यांना आनंदी ठेवणे हेच एका आदर्श पत्नीचे कर्तव्य आहे. असं केल्याने त्यांची कामातील उर्जा वाढेल, त्यांची प्रगती होईल आरोग्य उत्तम राहील, हे सर्व काही माझ्या आनंदी राहण्यावर अवलंबून असेल, तर मी का नाही आनंदी राहायचं…


आनंदी राहा आनंदात जगा..

माझं लग्न झालेलं असलं तरी लग्ना आधीही मी आनंदीच होते …. !!
कारण मी आनंदी आहे ती माझ्या स्वत:मुळे… !!”


” माझं जगणं दुसऱ्या कुणापेक्षा तरी जास्त चांगलं आहे, म्हणून मी आयुष्यावर प्रेम करते असं नाही , तर आनंदात राहायचं, हे मी स्वत:च ठरवलं असल्यामुळे मी आनंदी आहे …!! ”


” माझ्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी मीच स्वतः वर घेतली असल्यामुळे माझ्याबरोबर जगणाऱ्या कुणालाही मला आनंदी ठेवण्याचं ओझं बाळगावं लागत नाही . त्यामुळे माझ्याशी बोलताना , वागताना त्यांना अतिशय मोकळेपणा जाणवतो …!! ”


आणि यामुळेच मी इतकी वर्ष आनंदात संसार करू शकले . तुमचा आनंद कधीही दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ देऊ नका …!! ”वातावरण चांगलं नसलं तरी, आनंदी राहा … !! आजारी असलात तरी, आनंदी राहा . !! कठीण परिस्थितीत , पैसे नसले तरी, आनंदी राहा … !! कुणी तुम्हांला दुखावलं , कुणी तुमच्यावर प्रेम करत नसलं , अगदी तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठरवू शकत नसलात , तरी आनंदी राहा … !!


तुम्ही स्त्री , पुरुष कुणीही , कितीही वयाचे असा … !! असाच विचार करायला हवा … !! नाही का …. ?


आनंदी राहा… आनंदात जगा …!!

Leave a comment