🚩 जगात भारी आम्ही कोल्हापूरी 🚩
कोल्हापूर मध्ये असे काही शब्द आहेत की, जे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा तुम्हाला ऐकायला मिळणार नाहीत.
आम्ही कोल्हापूरी
😝मर्दा वाचतुय न्हव…😝
डबरा😝 (खड्डा)
ल्हिव😝 (लिहणे)
कोर्ड्यास😝 (रस्सा भाजी)
भगुणं😝 (पातेलं)
चिच्चा😆(चींच)
चिच्चुकं😆 (चिंचेच्या बिया)
खाँड😝 ( वासरू)
रेडकु😝(म्हैशिच पिल्लू)
पिटिव 😝( पेटव)
खोबरेल त्याल😝 (नारळ तेल)
एशेल त्याल 😆 (गोडेतेल)
म्या😝 (मी)
च्या 😝(चहा)
फवं😝(पोहे)
ईस्कुट😝 (खेळ खंडोबा)
वज्ज😝 (ओझे)
गबस😝 (गप्प बस)
लांबडं😝😝😝😝 (साप)
कानवला😝 (करंजी)
आदुगर😝 (आधी)
वाडूळ😆(बराच वेळ)
कळवंडणे😆(भांडणे)
इचार😝 (विचारणे)
आडगं 😝(वेडा)
निवद 😝(नैवेद्य)
गुळमाट😝 (गोड)
हान /बडीव 😝(मार)
ढांपी😝 (फांदी)
शिस्तात😝 (हळू)
कडं कडनं सुट😝 (परत जा)
बारडी😝 (बादली)
डांब😆 (खांब)
गुडग्यात मेंदू 😝(अर्धवट)
महादबा रोड😆 (महाद्वार रोड)
लज्गरी😆(लक्जरी बस)
टाम्याटु 😝(टोमॅटो)
हारकलाईस काय😝😝 (रोमांचित)
हरखून टुम्म😝 (एकदम खुश)
टक्कुरं😝् (डोकं)
साळुता😆(झाडू)
बसल्या बैठकीला😆(लगेच)
वळका बघू😝 (ओळखा पाहू)
डोस्क्यात काय इना😝 (आठवेना)
घुमीव😝 (फिरव)
हान😝 (मार)
रगात😝 (रक्त)
गप गार😝 (चिडी चुप)
ढोपार फुडीन😆(कोपर फोडीन)
लय राघु वानी बोलु नगस😆(मस्का मारू नको)
इरुन फिरुन गंगावेश (पुन्हा तिथेच)
डोस्कं😆 (डोकं)
बुंडुकल्या 😝(छोट्या)
हेंगाड😝 (वेडपट)
भस्का 😝(भगदाड)
वाइच😝 (थोडे)
कुटं हुतास😝 (कोठे होतास)
आंग तिथं😆 (हा तिथे)
यदुळा😆 (या वेळी)
लय😆(खूप)
ट्याक्टर😆(ट्रँक्टर)
हितं😆(इथे)
आईतवारी😆 (रविवार)
सोमार😆 (सोमवार)
बेस्तरवार😆 (गुरुवार)
सुक्कीरवार😆 (शुक्रवार)
धुरळा😆 (धूळ)
आंतराळी😆(अधांतरी)
मायंदाळ😆(खूप जास्त)
हे शब्द तुम्हाला कोल्हापूर मध्येच ऐकायला मिळतील.👍👍
म्हणूनच म्हणतात ना
*जगात भारी #कोल्हापूर लय भारी*
😘😘😎😎