स्वयंपाकघरातील टिप्स … ( Kitchen Tips )

स्वयंपाकघरातील टिप्स … ( Kitchen Tips )

स्वयंपाकघरातील टिप्स ... ( Kitchen Tips )

◆मिरचीचा ठेचा हिरवा रहान्यासाठी वाटतांना त्यात लिंबाचा रस घालून वाटावे  म्हणजे ठेचा हिरवागार रहाताे.


◆पालेभाजी पातळ करायचा असली तर भाजी नेहमीप्रमणे फाेडणी करुन तयार करावी  एका लहान वाटीत एक टेबलस्पून डाळीचे पीठ थाेडया पान्यात कालवुन भाजीला उकळी फुटली की टाकावे भाजी दाटसर हाेते.



◆कटलेट करतांना त्यात ब्रेडचा चुरा मिश्रणात पण घालावा व वरूनही घाेळवावा मग डीप फ्राय करावे कुरकुरित लागते.



लसुण जास्त प्रमाणात सोलायचा असेल तर पाकळया तव्यावर परताव्या साली पटकन निघतात.



◆मटार स्वस्त असेल तेव्हा दाणे काढावे एका भांडयात पाणी ऊकळत ठेवावे तयात एक चमचा साखर टाकावी उकळायला लागली की गॅस बंद करून त्यात मटारदाणे टाकावे पाच मिनटे तसच ठेवावे नंतर निथळुन पंख्याखाली वाळवावे पिशवीत भरुन सील करावे फ्रिजमधेे (डीप फ्रिज )ठेवावे कधीही वापरता येतात.



◆किचनचा ओटा काळा कुळकुळीत हवा असेल तर लहान कापडावर गाेडतेलाचे पाच,सहा थेंब टाकुन ओटा पुसून घयावा. (कापड ओले करु नये,हे काम ओटयावर काही काम नसेल तेवा करावे )पांढरे डाग पडले असतील तर ते लगेच जातात  व ओटा काळा हाेताे.



◆काेकम सरबत जुने झाल्यास त्यात थाेडे पाणी व नारळ दुध घालावे ताज्या काेकमासारासारखे गुलाबी रंगाचे हाेते .(नेहमीप्रमाणे फाेडणी घालून)



◆ओला नारळाच्या वडया करतांना खवलेला नारळ,साखर,दूध सम प्रमाणात घेऊन मिक्सरवरुन फिरवणे कढईत शिजवणे ,सगळ एकञ केलयाने खव्यासारखी चव वडीला येते .



◆दिवाळीतले लाडु,बरफी,पेढे करंजी सारण उरले तर एकञ करून मिकसरवर फिरवणे व कणकेत भरून त्याच्या पाेळया कराव्यात  सांजाेरी सारख्या लागतात बाजुने तूप साेडावे.



◆डाेशासाठी तांदुळ व डाळ भिजत घालतांना तयात एक छाेटा  चमचा मेथीदाणेही भिजत घालावे डाेशाला चांगला रंग येताे व चव छान येते अगदी हॉटेलसारखी.



◆बुंदीचे लाडू उरल्यास ते फ्रिजमधे घट्ट डब्याच्या झाकणात  ठेवावेत लागतील तेव्ह काढून तयांचा मिक्सरवर थाेडा चुरा करून तयात थाेडे काेमट दूध घालून पुना लाडू बनवावे चांगले ताजे माेतीचूर सारखे लागतात.

◆लाडूचा पाक जासत पक्का झाला तर लाडू नीट वळला जात नाही भगरा हाेताे तेवा ते कुकरच्या डब्यात ओतुन त्यावर थाेडा दुधाचा शिपका मारुन दाेन शिटया कराव्या, लाडू चांगले हाेतात,
लाडूत तुप जास्त झाले तर ते चपटे हाेतात अशावेळी त्यात थाेडा रवा किंवा बेसन काेरडे भाजून घालावे किंवा दुध पावडर घालावी .


◆तळतांना करंज्या फुटू नये मनुन दुधाचा हात लावून तळाव्यात तेल किंवा तुपही खराब हाेत नाही.



◆अळुवडी केल्यावर पीठाचे मिश्रण उरले तर ते पाेळीवर पसरवुन तयाचा घट्ट राेल करावा व अळुवडीसारखा वाफवुन घ्यावा नंतर तयाचे तुकडे कापून तळावे खुसखशीत बाकरवडया सारख्या लागतात अशाचप्रकारे साधे भजीचे पीठ ,बटाटा उकडून त्यात दाबेलीचा मसाला घालुन वरिलप्रमणे कृती करावी.



◆जायफळाला किड लागू नये म्हणून ते रांगाेळीमधे खुपसुन ठेवावे.  लागेल तेव्हा धुऊन घेऊन वापरावे.



◆करंजीचे पीठ निरशा दुधात ( न तापवलेल्या) भिजवावे पारी खुसखुशीत हाेते.



◆कडधान्यांना माेड येन्यासाठी आपण ते फडक्यात बांधताे, त्यापेक्षा कडधान्ये एका भांडयात घालून कुकरमधे राञभर झाकण लावून ठेवावे चांगले माेड येतात.



◆केळे घालून शिरा करायचा असल्यास तुपात़च केळयाचे काप तळावे मऊसर झाले की तयात रवा टाकुन नेहमीप्रमाणे शिरा करावा व त्यामुळे केळयाचा चांगला वास शिऱ्य्याला येताे व काप काळेही पडत नाही.



◆बाजारातुन रवा आणल्यावर ताे हाताला चटका बसेल इतपत किंवा तांबूस रंगावर (फार लालसर काळपट नकाे) भाजून ठेवावा म्हणजे त्यात आळया, किडे हाेत नाहीत. तसेच कडधान्येही हाताला गरम लागतील इतकी भाजुन गार झाल्यावर बरणीत भरुन ठेवावीत. किड लागत नाही.



◆श्रीखंड करतांना चक्यामधे नेहमी पिठीसाखर वापरावी लवकर विरघळते व श्रीखंड पातळही हाेत नाही.



◆शेवग्याच्या शेंगा उकडतांना फुटु नये म्हणून त्यात छाेटा गुळाचा तुकडा घालावा व मीठ चाेळुन ठेवावे फुटत नाही चव पण येते.



◆बरेचवेळा खिचडी भांड्याच्या बुडाला लागते (करपते) तेवा लगेच परातीत गार पाणी टाकुन त्यात ते भांडे ठेवावे म्हणजे चिकटलेला भाग लगेच निघून येताे



◆सुके खाेबर जासत दिवस टिकन्यासाठी ते मिठाक्या पान्यात धुऊन ऊन्हात वाळवावे पांढरे स्वच्छ हाेते



◆नासलेलया दुधाच्या चाेथ्यामधे थाेडी साखर व मिलक पावडर टाकून कढईत परतावे घट्टसर झाले की एका ताटलीत थापावे चांगली मलई बरफी तयार हाेते( हवे  असल्यास वेलची पावडर कींवा राेझ इसेनस टाकावा  किंवा  चाेथा व साखर मिक्सरवर काढुन त्यात वेलची पावडर टाकुन पेढे बनवावेत . चांगले लागतात.



◆सुकी फळे, काजु,बदाम वगैरेमधे थाेडे मीठ मिसळुन ठेवले तर त्यात कीड हाेत नाही व खुप दिवस चांगले रहातात.



◆फ्रुट सँलड करतांना त्यात custer पावडरऐवजी केळी, सफरचंद एकञ मिक्सरमधून वाटून टाकले तर दाटसर हाेउन रंगही चांगला येताे.



◆कढीपततामधे कँलशिअम भरपुर असते मणुन काेणतीही चटणी करतांना किंवा भाजीचे वाटण करतांना वाटणात घालावा म्हणजे कढीपत्ता खातांना बाजुला काढावा लागणार नाही .

पुरया करतांना कणकेत थाेडी साखर घालावी खुसखुशीत हाेतात


◆ब्रेडच्या कडा कापुन वाळवुन सवचछ बरणीत भरून ठेवावया केव्हाही सुप, कटलेटमधे टाकता येतात.



◆खिर घट्ट करायची असल्यास ती आटवन्याऐवजी त्यात कॉनपलाेअरची पेस्ट्ट करून टाकावी  चांगली दाटसर हाेते चवीतही बदल हाेत नाही.



◆आमलेट करतांना तव्यावरील तेलात थाेडे मीठ भुरभुरुन पसरवावे म्हणजे अंडे तव्याला चिकटत नाही.



◆घरात झुरळे झाल्यास पाव वाटी मैदयामधे दाेन चहाचे चमचे बाेरिक पावडर टाकुन पेसट करावी ब्रशने ओट्याच्या कडेकडेने खालीवर सगळीकडे लावावी वर्षभर तरी झुरळे हाेत नाही असा अनुभव आहे (हे काम राञी झोपण्यापूर्वी करावे)



◆किचनमधे दिसेल अशी एक पाटी टांगुन ठेवावी तयावर घरचयांसाठी बाहेर जातांना काही सूचना असतील तर तया लिहुन ठेवता येते व बाहेरुन काही आणायचे असले तर तेही लीहीता येते मणजे विसरायला हाेत नाही (काेणती वसतू,काेणाचा निराेप वगैरे)

कांदे बटाटे एकत्र ठेउ नये कुजतात.


◆बराचवेळा कापूर डबीतून उडून जाताे दरवेळेस नविन आणावा लागताे मणून डबीत थाेडे तांदुळ टाकून ठेवले तर बरेच दिवस रहाताे.



◆हरबराडाळ भाजून दळावी ती हलकी हाेते काेणतेही पदार्थ बाधत नाही उदा. पिठले,लाडू वगैैरे…



◆पावभाजीला छान लाल रंग येणयासाठी तयात एक बीट किसुन घालावे चवीत फरक पडत नाही …



स्वयंपाकघरातील टिप्स ... ( Kitchen Tips )

◆एखादेवेळेस वरण नीट शिजले नाहीतर ते मिक्सरमधून फिरवुन घ्यावे एकजीव हाेते.


◆साबुदाणा भिजत घालताना तयात दाेन तीन टेबलस्पून दुध घालावे माेकळा हाेताे.

0 thoughts on “स्वयंपाकघरातील टिप्स … ( Kitchen Tips )”

Leave a comment