*🌹आईची शिकवण 🌹*
*नवीनच लग्न झालेली एक मुलगी दर वेळेला माहेरी आली की आई जवळ नवऱ्याची व सासरच्यांची तक्रार करीत असे, तो रागीट आहे, मला समजावून घेत नाही, सासू लहरी आहे, त्यांना माझ्या भावना कळत नाहीत वगैरे आईला सांगत असे.*
–
आईने चार पाच वेळेस तिचे ऐकले आणि मग ती मुलीला म्हणाली—
” बाळे, माझं नवीन लग्न झालं, तेव्हा मी देखील या प्रसंगातून गेले, फक्त मी माझ्या आईला असं कधी सांगत नव्हते. मी स्वतः माझी विचार शक्ती वापरली आणि आपोआप परिस्थिती बदलली बघ.”
*” म्हणजे कसं “? मुलीने विचारले.*
*आई हसून म्हणाली— ” मुली, स्त्रीचं खरं चातुर्य हे सासू ,सासरची मंडळी व नवऱ्याला आपलं करून घेण्यात आहे. सासू ,सासरे यांच्या पोटात घुसून राहायचे.*
*दिर ,नंदा जावा यांना जिव लावायचा. आधी आपण त्यांचा आदर करायचा कारण ते तुझ कर्तव्यच आहे.*
मी काय तुला सल्ला देईनही, पण किती दिवस? तेव्हा लक्षात ठेव, आई वडीलांनी मुलीच्या संसारात नाक घालन बर नाही. ज्या घरात आपल्याला दिलं आहे, तिथंच आपण रहाणार आणि तिथंच मरणार. तू तुझ्या नवऱ्याचा व सासू , सास-यांचा स्वभाव आधी ओळख, तुझा नवरा कुठे दुःखी आहे हे पहायचे, त्यांचा अहंकार सांभाळ, त्याच्या घरातल्यांना जप. तू त्यांना थोडासा मान दे, त्यांला थोडं स्वातंत्र्य दे, तू जरा नमतं घ्यायला शिक आणि मग पहा काय चमत्कार होतो ते!
*पुढचे वेळी आल्यानंतर मला सांग .”*
चार महिन्या नंतर मुलगी पुन्हा माहेरी आली, आल्या बरोबर तिने आईला मिठी मारली, मग ती आईला म्हणाली—
” खरंच ग आई, तुझी शिकवण माझ्या कामी आली. मी स्वतः चा स्वभाव थोडा बदलून घेतला. आता माझ्या नवऱ्या मधे व त्यांच्या घरच्यांमध्ये इतका बदल झाला आहे काय सांगू ! मला सोडून घरातल्यांना एक क्षणही करमत नाही, मला मान सन्मान देतात. आणि आई, आणखी एक गोष्ट मी शिकले बघ ”
” कोणती बाळ “?
” हेच, की आपल्या अडचणी आपणच सोडवल्या पाहिजेत, थोडी स्वतः ची बुद्धी वापरली पाहिजे. दर वेळी आई वडील तरी काय सांगणार ? आणि खरचं मुलीच्या संसारात आईने ढवळाढवळ करु नये हेच खरे.
मुलीचे ते बोलणे ऐकून आईला खूप कौतुक वाटले आणि तिने मायेने लेकीला जवळ घेऊन कुरवाळले .
आज तिच्या मुली मधे आत्मविश्वास निर्माण झाला होता. मुलगी परत निघाली, तेव्हा ती आई म्हणाली—
*”ताई, सगळ्याच मुलींनी जर आपल्या स्वतः च्या सद् सद् विवेक बुद्धीने असे घरगुती प्रश्न सोडवले, सर्वांचा आदर केला तर संसार किती सुखी होईल !”*