शास्त्रज्ञ टेसी थोमस ” मिसाईल वुमन “
दिसायला काकूबाई वाटत असल्या तरी त्या कुणी सामान्य गृहिणी किंवा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या कोणी उमेदवारही नाहीत. अफाट आणि अचाट कर्तुत्व असलेल्या ह्या महिलेचे नाव आहे “टेसी थॊमस”, एक असे नाव जे तुम्ही कधीच ऐकले नसणार. कदाचित पुढेही कधी ऐकणार नाहीत. कारण मिडिया अशा लोकांना कधीच प्रसिद्धी देत नाही. त्यासाठी आपले क्रिकेटपटू आणि सिनेस्टार त्यांच्या दिमतीला आहेतच.
👉कलामहर्षी….एस .एम.पंडित. [KALAMAHARSHI – S. M. PANDIT.]
डॉक्टर अब्दुल जे कलामना आपण ” मिसाईलमन ” म्हणून ओळखतो. तर आपल्या देशातील हजारो शास्त्रज्ञ टेसी थोमसना ” मिसाईल वुमन ” म्हणून ओळखतात. टेसी थोमस ” भारतीय अंतराळ संशोधन संस्थे ” ( इस्रो ) च्या अधिपत्याखालील डिफेन्स रिसर्च अंड डेवलपमेंट ऑर्गनायाजेशनमद्धे त्या कार्यरत आहेत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर तब्बल दोन हजार शास्त्रज्ञांच्या प्रमुखपदी असलेल्या त्या देशातील एक महान शास्त्रज्ञ, ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात देशाने ” अग्नी ” क्षेपणास्त्राचा पल्ला चार हजार ते पाच हजार किलोमीटर गाठून देशाच्या शत्रूंच्या हृदयात धडकी भरवली आणि देश अधिक सुरक्षित करण्यात मोलाचा वाटा उचलला. टेसी थोमस यांच्या त्या अफाट कर्तुत्वाला माझा त्रिवार सलाम !
शास्त्रज्ञ टेसी थोमस ” मिसाईल वुमन “
केरळमधे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या टेसीचे नाव टेसी पडले ते मदर तेरेसाना आदर्श मानणाऱ्या तिच्या आई वडिलांमुळे. लहानपणापासूनच जवळून अवकाशात झेप घेणाऱ्या क्षेपणास्त्राना, उपग्रहांना पाहून तिला त्या क्षेत्राविषयी कुतूहलमिश्रित ओढ लागून राहिली होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे आयपीएस अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न होतं. पण ती वळली अंतराळ संशोधन संस्थेकडे. पुण्यामधे राहून तिने एम.टेकची पदवी घेतली. तिच्यातील अफाट बुद्धिमत्ता हेरून डॉक्टर अब्दुल जे. कलाम यांनी तीचा समावेश अग्नी क्षेपणास्त्र प्रोजेक्टमधे केला. आणि स्वतःच्या अफाट बुद्धीमत्तेच्या बळावर त्या तडक अग्नी क्षेपणास्त्र ५ च्या प्रोजेक्ट डायरेक्टर पदावर जाउन पोहोचल्या.तेव्हा त्यांनी एक इतिहासच घडवला. तेव्हापासून त्यांची ओळख ” अग्निपुत्री ” म्हणूनही झाली.
आज ४९ वर्षे वय असलेल्या ट्रेसी थोमस एक आदर्श गृहिणीही आहेत. करिअर आणि संसार अशी कसरत त्यानाही रोजच करावी लागते. २४ तासामधे कोणत्याही क्षणी कामावर हजार राहावे लागत असूनही आपल्या हाताने बनविलेला स्वयंपाक कुटुंबातील सदस्यांना देण्यातील आनंद त्या भरभरून घेत असतात. देश अधिक सुरक्षित करण्यासाठी अधिकाधिक लांब पल्याची क्षेपणास्त्रे विकसित करण्याच्या नवनवीन कल्पना राबविताना त्यांना आपण हे सारे जागतिक शांततेसाठीच करतोय ह्याचे चांगलेच भान असते. दुर्दैवाने आपल्या देशाने त्यांना कधी पद्मश्री, पद्मभूषण किताबाने सन्मानित केले नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव.
” मिसाईल वुमन ”
मित्रानो, टेसी थोमस यांची कहाणी देशातील करोडो स्त्रियांना प्रेरणा देणारी ठरावी. आणि आजही महिलांना ” पानी कम ” समजणाऱ्या फेसबुकवरील असंख्य महाभागांना एक सणसणीत चपराक ठरावी ज्यांनी मला अनेक वेळा नाउमेद करून माझे पाय खाली खेचायचा प्रयत्न केला. आज इस्रोमद्धे तब्बल बाराशे महिला शास्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. देशातील करोडो महिलांची मान गर्वाने उंचावणारी त्यांची ती अफाट कामगिरी येत्या काळात महिलांना प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यायला प्रेरित करेल याविषयी माझ्या मनात शंकाच नाही.
प्रेरणादायी अशी मला आलेली पोस्ट.!!