🕮⮞मराठी प्रेरणादायी सुविचार⮜🕮
➤ एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
➤हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे
व ती
पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!
➤शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा.
क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
➤केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं
आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
➤चिंता ही कुठल्याच दुःखावरचा
उपाय होऊ
शकत नाही.
➤तलवारीच्या जोरावर मिळवलेलं
राज्य
तलवार असेतोवरच टिकतं.
➤जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत:
झीजा आणि इतरांना गंध द्या.
➤आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून,
वाचून,
बघून समजत नाही.
➤मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की
शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
हेही वाचा – 70 “इंग्रजी सुविचार”
➤मोहाचा पहिला क्षण,
ही पापाची पहिली
पायरी असते.
➤जगात सारी सोंगे करता येतात,
पण पैशाच
सोंग करता येत नाही.
➤प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,
पण शत्रू निर्माण करू नका.
Marathi motivational quotes
➤संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा
गुण आहे.
➤ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
➤दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे
आणि एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत
बसणे हे त्याहून बरे.
➤आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी
आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची
तसदी घ्यावी लागते.
➤बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम
निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची
जागा घ्यावी.
➤चांगले काम करायचे मनात
आले की ते
लगेच करून टाका.
➤भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
➤संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.
Marathi motivational quotes
➤तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही
म्हणून निराश होऊ नका ;
कदाचित
त्याने तूमचे चांगले होणार नसेल.
➤केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
➤लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
तोंडावर ओढुन घ्यावी तर
लगेच खाली
पाय उघडे पडतात.
➤झाडासारखे जगा, खूप उंच व्हा.
पण जीवन
देणाऱ्या मातीला विसरू नका.
➤शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका
आणि जर
का घेतले तर
त्या व्यक्तीलाही तशीच मदत
करा.
➤अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं
हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.
➤ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात
तो
कधीही एकटा नसतो.
➤बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !
➤आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या,
पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.