मनाचे शत्रू ( Enemies Of The Mind )
*हा मेसेज हळुवार पणे वाचा, वाचताना हसू नका.*
“मोह“ “लोभ“ “इर्षा“
जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो, त्याला “मोह” म्हंणतात.
जेव्हा कुल्फी खाऊन झाल्यावर कुल्फीची दांडी चाटतो, त्याला “लोभ” म्हणतात.
कुल्फीची दांडी फेकून झाल्यावर, समोरच्याची कुल्फी अजून कशी संपली नाही ते पाहतो त्याला “इर्षा” म्हणतात.
“क्रोध“ “आळस“ “भिकारी“
काही वेळेस कुल्फी संपण्याच्या आधीच दांडी हातात राहून कुल्फी गळून जमीनीवर पडते त्याला “क्रोध” म्हणतात.
झोप पूर्ण होऊनसुद्धा जे काही लोक अंथरुणात लोळत राहतात त्याला “आळस”असे म्हंणतात.
हॉटेल मध्ये भोजन झाल्यावर, ओंजळ भर बडीशोप व साखर खातो त्याला “भिकारी” पणाचे लक्षण म्हंणतात.
“भय“ “उतावळेपण“ “शोषण“
बाहेर जाताना लावलेले कुलूप ओढून पाहाणे ह्याला “भय” म्हंणतात.
आपण व्हाट्सअप्प वर मेसेज पाठवल्यावर दोन निळ्या टीका दिसतात की नाही ते पाहतो त्याला “उतावळेपण” म्हंणतात.
पाणीपुरी खाऊन झाल्यावर कधी साधी पुरी, कधी मसाला पुरी, कधी गोड पुरी दे रे “भैय्या” असे म्हणतो त्याला “शोषण” म्हणतात.
“मृगतृष्णा“ “अक्षम्य अपराध“
फ्रुटी पिऊन झाल्यानंतर स्ट्राॕने शेवटच्या थेंबा पर्यंत फ्रुटी ओढत राहणे ह्याला “मृगतृष्णा” म्हंणतात.
चणे विकत घेता घेता थोडे चणे किंवा शेंगदाणे हातात घेऊन खाणे ह्याला “अक्षम्य अपराध” असे म्हंणतात.
“छळवाद“ “मोक्ष“
जेव्हा पंगतीत जेवताना मठ्ठा वाढणारा येत आहे हे पाहून पानांतील मठ्ठा गटागट पिऊन घेतो त्याला “छळवाद” असे म्हंणतात.
ही पोस्ट वाचून झाल्यावर गालातल्या गालात हसू येणे म्हणजे “मोक्ष”.
❤️❤️शुभ दिवस ❤️❤️
😃😃😜🤪😊😇😁