मध्यमवर्गीय [MIDDLE CLASS]

👨 मध्यमवर्गीय👨


👨 मध्यमवर्गीय👨 https://whatsapse.bmanikarts.in/




१. दारावर टॉवेल, पंचा वाळत टाकलेला असतो.


२. गोदरेजचं कपाट आणि त्याच्या आरशावर टिकल्याच टिकल्या!


३. महाराष्ट्रात घरातील कॅलेंडरचे २ प्रकार..


महालक्ष्मी


कालनिर्णय

🍲आमचं जेवणखानं🍲


४. रविवारी सकाळी लवकर जाऊन मटण/चिकन आणायचं आणि दुपारी जेवून मस्त झोप काढायची आणि रात्रीच्या जेवणाला पण तेच खायचं(रात्री फक्त रस्सा उरलेला असतो).


५. दुधाच्या राहिलेल्या पातेल्यातली खरवड (साय) चमच्याने काढून खायची. (कधी कधी त्यात चहासुद्धा करतात)


६. थंडी जरा कुठं कमी झाली रे झाली की घरात सगळ्यांना गार पाण्याने अंघोळ करायला सांगायची(करायलाच लावायची!).


७. पूर्वी रेशनिंगचा तांदूळ मिळायचा त्याच्या रविवारी इडल्या, डोसे करायचे आणि आम्ही ते शक्तिमान बघत बघत खायचो.


८. लग्नाच्या रात्रीच पाकिटं फोडून कोणत्या पाहुण्याने लग्नात किती आहेर दिला हे लिहून ठेवायचं.

हेही वाचा – अरेच्चा… जगायचं राहूनच गेलं … !


९. पोरांना दिवाळीत फराळ करायला जबरदस्ती मदत करायला लावायची. बरं ते करतांना चुकीला माफी नाही. जसं काय मी वर्षभर शाळेत ‘करंजीच्या पारीमध्ये सारण कसं भरतात’, ‘चकली न तुटता कशी पाडतात’ हेच शिकायला जातो! त्यात पण मातोश्रींचे तेच ठरलेले डायलॉग


मुलाला – “मी आहे म्हणून सगळा फराळ घरी करतीये. उद्या तुझी बायको आली की काहीसुद्धा करणार नाही. सगळं विकतचं आणेल!” किंवा “मुलगी असती तर मला हाताखाली मदतीला तरी आली असती. तुझा पोरगा असून काहीच उपयोग नाही. नुसतं गावभर फिरायला सांगा ह्याला.”


मुलीला – “एवढं झाल्याशिवाय अजिबात उठायचं नाही इथून! हाताला जरा कामाचं वळण नको? बाईच्या जातीला स्वयंपाक आला पाहिजे. नुसती शाळा शिकून काय उपयोग? उद्या सासरी गेल्यावर काय करशील देवास ठाऊक!”


👨 मध्यमवर्गीय👨 https://whatsapse.bmanikarts.in/




१०. एखादं दिवशी संध्याकाळी सहकुटुंब त्याच ठरलेल्या हॉटेलमध्ये जाऊन ‘राईसप्लेट’चा आनंद घ्यायचा. मग आई म्हणणार “हह! याच्यापेक्षा चांगलं मी घरी करते. कसल्या या पोळ्या बिनतेलाच्या! पण तुम्हाला बाहेरचंच चांगलं लागणार!”


११. कपडे, भांड्याच्या साबणाच्या वडीचे २ तुकडे करायचे.


🛍 आमची खरेदी 🛍


१२. कपडे घेताना आधी प्राईसटॅग शोधून किंमत बघायची. वाढतं वय असल्याने एक साईझ मोठी घ्यायची.


१३. घरातल्या वापरलेल्या चांगल्या कपड्यांचं एक गाठोडं बांधून ठेवायचं आणि बोहारीण आली की तिच्यासमोर ते रिकामं करायचं. मग पुढे तासभर ती बोहरीण आणि आई दारांतच त्या पसाऱ्यातून एक एक कपडा काढून त्याचा पंचनामा करतात.


बोहारीण – “ओ ताई, ही साडी खाली विरलीये बगा”


आई – “मग तुला आता काय दुकानातून नवीकोरी साडी आणून देऊ?”


बोहारीण – “हा शर्ट जुनाट वाटतोय खूप!”


आई – “जुना कसला? एकदा का दोनदाच घातलाय फक्त! त्याला आता बसेना म्हणून तुला देतीये. नवीनच आहे!”


(खरं तर आधी दादा आणि त्यानंतर मी पण तो वापरलेला असतो. पण काही कपडे अजिबात फाटतचं नाहीत. फाटले तर त्याची पायपुसनी होते आणि नाही फाटले तर मग अजूनही त्याला बाजारमूल्य असतं ते इथे उपयोगी येतं) जे कपडे बोहारिण घ्यायला निक्षून नकारच देते त्यांची रवानगी ‘वाकाळ आणि गोधडी’ या कामासाठी केली जाते.


हे सगळं करून झालं की शेवटी बोहरीण तिच्या पाटीतून चहाची गाळणी काढते तर इकडे आईने आधींच एक मोठासा डबा चाचपून बघायला सुरुवात केलेली असते. मग परत त्यावरून त्यांची जुगलबंदी सुरू होते ती शेवटी आईच्या “डबा देतीयेस का ठेऊ कपडे परत बांधून?” या वाक्यावर संपते. सुवर्णमध्य म्हणून चहाच्या पातेल्याचा तह दोघींमध्ये होतो! मग आई तिला चहापाणी विचारते. घरात काही खायच असेल ते देऊन बोळवणी करते. आईच्या डोळ्यापुढे अजूनही तो डबाचं असतो. पण “जाऊ दे! किती दिवस झालं त्या गाठोड्याची अडचणचं झाली होती. त्यापेक्षा हे पातेलं तरी मिळालं!” अशी स्वतःचीच समजूत घालून घेते.


१४. केस कापायला जाताना “अगदी बारीक कापून ये!” हे आई सांगतेच आणि दाढी वाढवली की आपला सारखा ‘मवाली’ या विशेषणाने उद्धार करत राहते.


१५. हातातून काही फुटलं की काळजात धस्स होतं आणि आपण ऑटोपायलट मोड मध्ये जाऊन मार खायला सज्ज होतो.


१६. महिनाअखेर आली की वरचं खाणं (टोस्ट,खारी, बिस्किटे ई.) बंद होत.


१७. पटकन देवाला संध्याकाळचा दिवा लावून टीव्ही सुरू होतो. संध्याकाळ झाली हे ‘होम मिनिस्टर’च्या शीर्षकगीताने समजतं. यानंतर मध्ये मध्ये ब्रेक झाला की कुकर लावणे, भाजी निवडणे, गॅस बंद करायला सांगणे अशी कामं केली जातात.


१८. एखादा नवीन पदार्थ केला की आधी देवापुढे ठेवायचा. मागच्यावेळी शेजारच्या काकूंनी काहीतरी पदार्थ करून दिलेल्या थाळीतून त्यांना द्यायचा.


१९. आपण दिवसभर मोबाईलवर पडीक असतो म्हणून चिडचिड करायची आणि आईला मावशीचा फोन आला की त्या किती वेळ बोलत राहतील त्याला काही नेम नसतो.


२०. फ्रिज जास्त वेळ उघडा ठेवायचा नाही. लाईटबील जास्त येतं.


२१. एशियाडचं तिकीट महाग असतं म्हणून लालपरीने प्रवास करायचा. जाताना उसळ-चपाती बांधून घ्यायची.


२२. मध्यमवर्गीय घरात फक्त केळी विकत आणली जातात.ती खाऊन संपली नाहीत तर त्याचं शिकरण करतात. बाकी सफरचंद वगैरे गोष्टी सहसा पाहुण्यांना भेटायला जाताना बसस्टँडच्या बाहेर विकत घेतात.त्यामुळे मध्यमवर्गीय घरात सफरचंद सहसा कोणीतरी भेटायला आल्यावर दिलेली असतात.


२३. रात्रीचं जेवण हे सकाळचं जेवण किती आणि काय शिल्लक आहे यांवर ठरतं.


👨 मध्यमवर्गीय👨 https://whatsapse.bmanikarts.in/


आणि सगळ्यात महत्वाचं


हेही वाचा – आनंदी राहा… आनंदात जगा …!!


“मी म्हणून इतकी वर्षं काटकसरीने संसार केला! कधी स्वतःची हौसमौस केली नाही.”


तसं पाहिलं तर आपण दुर्लक्षच करतो या वाक्याकडे पण त्या शब्दांमागे ”लग्न करून आलेली मुलगी” ते ”एक जबाबदार गृहिणी’ इथपर्यंतचा प्रवास दडलेला असतो.

Leave a comment