💙 बदाम – एक नैसर्गिक अँटी एजिंग पदार्थ 💛
⏩कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात. बदाम भिजवून खाणे फारच फायदेशीर ठरतात. बदाम भिजवल्यानंतर नरम होतात आणि पचण्यास सोईस्कर असतात.
⏩त्वचेच्या सुरकुत्या दूर होतात- त्वचेच्या सुरकुत्या दूर करण्यासाठी इतर कोणत्याही गोष्टींचा वापर करण्याऐवजी भिजवलेले बदाम खाणे श्रेयस्कर. हे एक नैसर्गिक अँटी एजिंग पदार्थ आहे.
⏩सकाळी भिजवलेल्या बदामाचे सेवन केल्यास चेहर्यारवर सुरकुत्या पडत नाहीत आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते. मधुमेही व्यक्तींना बदाम खाल्ल्याने त्यांचे शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
नैसर्गिक अँटी एजिंग पदार्थ
⏩भिजवलेले बदाम सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या भेडसावत नाही. कारण बदामामध्ये खूप अधिक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट व्यवस्थित साफ होते.
⏩बदामाची साल कोरडी असते. त्यामुळे ती काढून टाकण्याकडे लोकांचा कल असतो. परंतु त्याच्यात रक्त वाढवण्याची ताकद असते. तेव्हा बदामाचे बी त्याच्या सालीसहीत खाल्ले पाहिजे.
👉जाणून घ्या डाळिंब का खावे.. [ Learn why you should eat pomegranate ]
⏩वजन कमी करण्यासाठी आहारात भिजवलेले बदाम अवश्य सामील करा. त्यामुळे खूप वेळ भूक लागणार नाही. त्यामुळे वजन सहजपणे कमी होण्यास मदत होईल.
⏩भिजवलेल्या बदामांमध्ये प्री बायोटेक गुण असतात. त्यामुळे प्रतिकारक्षमता मजबूत होण्यास मदत मिळते. प्री -बायोटिक गुण असल्याने आतड्यांमध्ये असणारे चांगले जीवाणू वाढतात त्यामुळे आतड्यांवर परिणाम करू शकणारा कोणताही आजार होत नाही.
👉रक्त शुध्दीकरण
⏩बदामाचा दुसरा फायदा म्हणजे बदामामध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुध्दीकरण करण्यास उपयुक्त ठरते. बदामाच्या सेवनाने केस गळण्याचे प्रमाण कमी होते.
⏩बदामात असलेले फॉस्फरस हाडे आणि दातांना बळकट बनवते. तसेच हाड आणि दातांशी संबंधित आजार होण्याचा धोकासुद्धा कमी होतो. दातांसाठी आवश्यक असणारे फॉस्फरस बदामातून पुरेशा प्रमाणात मिळते.
⏩कोरडी त्वचा असणार्यांेना त्वचेचा स्निग्धपणा वाढवण्यास मदत होते. भिजवलेल्या बदामामध्ये पोटॅशिअम आणि कमी प्रमाणात सोडियम असल्यामुळे रक्तरदाबासह हृदयाशी निगडित समस्या नियंत्रणात येतात. त्यातील मॅग्नेशिअममुळे रक्त प्रवाह योग्य राहतो.