जाणून घ्या डाळिंब का खावे..
[ Learn why you should eat pomegranate ]
डाळिंब महत्व
डाळिंबचा रस पित्तक्षामक आहे. या फळाचे सेवन केल्यास अपचन दूर होते.
डाळिंब औषधी उपयोग
अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्घंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्घंधी निघून जाते.
डाळिंबाच्या सेवनाने दातांच्या किडीला सुद्धा प्रतिबंध केला जातो. डाळिंबाचा रस पिल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात.
डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.
जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.
डाळिंबच्या आतील पांढऱ्या रंगाच्या बिया डायरीया, तोंडाचा आणि घशाच्या अल्सरवर चांगला उपाय आहेत.
डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.
डाळिंबाच्या सालीचे फायदे
साल उकळून या पाण्याने गुळना केला तर तोडांचा वास येत नाही.
अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.
चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी डाळिंबाचा रस गुणकारक आहे. अनेक सौदर्यप्रसाधनांमध्ये डाळिंबाच्या रसाचा वापर करतात.
नियमित डाळिंब खाणाऱ्यांची त्वचा नेहमी तजेलदार राहण्यास मदत होते.
डाळिंब कधी खावे
पण डाळिंब सोलल्यानंतर त्याचे दाणे लगेचच खाणे आवश्यक आहे कारण दाणे उशिरा खाल्यानंतर त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे स्वाद व चवही कमी होते.