😊 आहे की नाही मजेशीर 😊
🌞चाळीस वर्षांपूर्वी🌞
🍃चाळीस वर्षांपूर्वी मुले पालकांशी अदबीने आणि आदराने वागायची. आता पालकांना मुलांशी आदराने वागावे लागते.
🍃 चाळीस वर्षांपूर्वी प्रत्येकाला मुले हवी असायची, आता अनेकांना मुले असण्याची भिती वाटते.
🍃 चाळीस वर्षांपूर्वी लग्ने सहज व्हायची आणि घटस्फोट मिळणे अवघड होते.आता लग्न जमणे अवघड झाले आहे आणि घटस्फोट मिळणे सोपे बनले आहे.
🍃 चाळीस वर्षांपूर्वी लोकांना कष्ट करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून भरपूर खावे लागायचे, आता कोलेस्टेरॉल आणि कॅलरीज च्या भीतीने लोक खायला घाबरतात.
हेही वाचा – ” ती ” आहे म्हणून.
🍃 चाळीस वर्षांपूर्वी खेडेगावातील लोक नोकरीच्या शोधात शहरात यायचे. आता शहरातील लोक ताणतणावातून मुक्ती आणि शांततेच्या शोधात खेडेगावात जातात.
🍃 चाळीस वर्षांपूर्वी खात्यापित्या घरातील दिसण्यासाठी धडधाकट दिसावे यासाठी प्रयत्न करायचे.आता लोक तंदुरुस्त दिसण्यासाठी डायट करतात.
🍃 चाळीस वर्षांपूर्वी श्रीमंत व्यक्ती आपण गरीब असल्याचे दाखवण्यासाठी धडपडत असत.आता गरीब व्यक्ती आपण श्रीमंत असल्याचे भासवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.
🍃 चाळीस वर्षांपूर्वी एक व्यक्ती सगळ्या कुटूंबाचा चरितार्थ चालवत असे. आता कुटूंबातील एका मुलासाठी सगळे नोकरी व्यवसाय करत असतात.
🍃 चाळीस वर्षांपूर्वी संवाद साधण्यासाठी साधन नव्हते. आता संवादासाठी वेळ नाही.. माणसे नाहीत.
कुठे आणि कसे पोहोचलो आपण….??
🌞 आहे ना कीती छान 🌞