❤❤स्त्रीशक्ती❤❤
संस्कृतीने मस्त मोर नाचणाऱ्या पैठणीचा पदर हातभर पसरून घेतला.. कंबरेपर्यंत लांब केस छान मोकळे सोडून खांद्यावरुन एका बाजूला घेतले.. डायमंडची सुंदर टिकली लावली.. आणि रुमधून ऑफिससाठी बाहेर पडली.. !
फरशीवर लोळणाऱ्या पदरावर नवऱ्याचा पाय पडल्यावर लगेचच तो म्हणाला, अगं पदर नीट पीनअप कर आताच्या आता आणि निघून गेला..! समोरून सासूबाई आल्या आणि म्हणाल्या अगं सुनबाई केस मोकळे सोडून जाणं बरं नव्हे घट्ट वेणी बांध आणि मगच जा..! देवघरात पाया पडायला गेली असता सासरेबुवा दिसले, थोडंफार बोलणं झालं आणि लगेचच सासरे म्हणाले अगं सुनबाई ती कसली पांढरी टिकली लावलीस.. जरा भडक कुंकू लाव की..!
हे सर्व काही मिनिटामिनिटांच्या फरकाने घडत गेलं.. पण, संस्कृतीने लगेचच पदराची छानशा प्लेट्स पाडून पदर पिनअप केला.. टिकलीच्या वरच्या बाजूला ठसठशीत कुंकू लावलं.. आणि केसांची छानशी वेणी बांधून मानेवरून पुढे घेतली.. आणि जाता जाता तुळशीसमोर उभी राहून खांद्यावर पदर घेऊन नमस्कार करत म्हणाली, अशीच माझ्या अंगणी खुललेली राहा.. असंच माझ्या सौभाग्याची आणि माझ्या ह्या माणसांची काळजी घे.. कारण आजही बघ ना, किती काळजी घेतली माझी या लोकांनी. पदरावर पाय पडून मी धडपडली तर… या विचाराने माझा नवरा व्याकुळ झाला.. केसांत झालेल्या जटा सोडवताना दुखलं तर…या विचाराने माझ्या सासूला धस्स झालं.. आणि कपाळावर कुंकू नाही लावलं तर माझा आत्मकेंद्रबिंदू कसा स्थिर राहील म्हणून सासऱ्यांना काळजी वाटली.. इतकी काळजी करणाऱ्या लोकांना दिवसभर बघायला मी सोबत नसते पण तू मात्र सदैव इथून त्याना आशीर्वाद देत असतेस.. म्हणूनच घरामध्ये माझ्या असण्यापेक्षा या घरासमोर तुझं असणं जास्त गरजेचं आहे..!
तर, ज्यांनी हे लिहिलं त्यात खूप खोल विचार दडला आहे.!
1) तिघांनी तीन गोष्टी सांगितल्या पण तुळशीसमोर पदर घेऊन उभं राहायचे संस्कार हे संस्कृतीतच होते.
2) त्या तिघांनी मला रस्त्यात टोकलं याबद्दल विचार न करता त्यामागे त्यांची काळजी कशी लपली होती हे तिने शोधून काढलं
3) सौंदर्यातील सारं काही बदलून देखील तिचा आनंद तसूभरसुद्धा कमी झाला नाही.
4) सौंदर्य, संस्कार, आदर, आज्ञा, इच्छा, स्वप्न, आशा, जबादारी, प्रेम, राग , लोभ, मनमानी सारं काही रस्सीच्या दोन टोकांना बांधून तिने तिचा मधला प्रवास हसत हसत सुरू केला..!
निष्कर्ष –
चांगलं शोधायला शिका, वाईट दिसणारचं नाही !
आनंद आपण आपला निर्माण केला की आनंदासाठी कोणावर अवलंबून राहायला लागत नाही!
संस्कारात राहून सुद्धा स्टायलिश होता आलं तर स्त्रीपण लवकर सिद्ध करता येतं.
परिस्तिथीची जाण आणि अस्तित्वाचं भान ठेवलं की संसाररूपी कोर्टात सारेच आपले जज होतात.
कितीही त्रास झाला तरी देवापुढे देखील हार मानत नाही जो घास पुढ्यात पडेल तोच सोनं म्हणून खाते ती एक स्त्रीशक्ती असते..!
छान माहिती..
thanks