बाप्पांचे आगमन..

” ह्या बघ आजयेच्या घराकडे जातस..नीट जा हा आणि मुख्य म्हणजे थंय गेल्यावर अजिबात मस्ती करायची नाय. एका जाग्यावर बसान रवायचा. माका कोणी विचारल्यान तर मी चवथ्या दिवशी येतलय म्हणून सांग. आजवळाक गेल्यावर नवीन वस्तू मागू नको हा, मागच्या वर्षीचा चलात म्हणून सांग हा. फक्त उगाच जास्त नको म्हणून सांग हा, ते लाड लाड करीत रवतले.

fb img 16951072790356007851351273900602


निवेदाक येळ लागलो तर शांत बस हा बाबू.. आणि हा निवेदाचा ताट इल्यावर संपवून टाक हा, तू जेवच पण उंदीरमामा जेवलो काय त्यावर तूच लक्ष दि हा. परत सांगतय आजवाळचे लोक कामात असतले, तू हट्ट नको हा करु कसलो !

आरतीवाले आणि भजनावाले येतले त्या प्रत्येकाक प्रसाद आणि खावक गावला काय ता तू स्वतः बघ, घरातले गडबडीत असतले तू जरा मदत कर हा. आणि हा घरात कोण नसताना तुका बघुक पावणे इले तर त्यांच्यावर लक्ष ठेव ! तोरणाच्या ब्लपच्या जवळ जावं नको हा, आणि एकाच काडयेवर धा बारा तोरणा असतली तेव्हा जरा जपान.. आजवळाक लहान लहान बाबू असतले. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेव. तुका पाया पडाक म्हणान येतले आणि फटाकरे लावक अगरबत्ती पळवन घेवन जातले.

दिवस कमी आसतले, जो जो समोर येयत त्या प्रत्येकाचा म्हणना आयकायचा आणि ती घरात बसलेली आजी असतली तिका काम संपली की तुझ्यासमोर दोन मिनिटांसाठी वायच बस गे म्हणून बोलवन आणायचा. कशी आसस गे, दमलस काय गे, मी येव काय मदतीक असा ईचारायचा, तिका मदत लागणा नाय, पण कोणी ईचारल्यावर तिका बरा वाटता ना !

आणि हा, सगळ्यांका सांग मनापासून कायता करा, उगाच म्हागायच्या नादात पयशे सरव नको, त्यापेक्षा सगळे बोला माझ्याशी, ताच खूप हा.. तू पण प्रत्येकाशी बोल, समोरच्याक बोलतो कर..

नीट जा, येताना मी आसान पण तू येताना शिदोरी घेवन ये आठवणीन.. बाकी आमचो सगळ्यांचो लक्ष हा तुझ्यावर..फक्त दिवस उगाच लवकर सरव नको, पूरवन वापरुक सांग सगळ्यांका.. आणि हा खबरदार, जाताना बारक्यांका रडवलस तर !

जा सगळा घर तुझा हा. मठीचा देऊळ करून ये”

लेखक – ऋषी श्रीकांत देसाई..

Leave a comment