⏹किचन टिप्स⏹
किचन मधील सकाळची धांदल तुम्हाला कमी कराची असेल तर आम्ही दिलेल्या ह्या टिप्स तुमचा हा त्रास नक्कीच कमी करू शकतात ..तर ह्या किचन टिप्स वापरायला मुळीच विसरू नका….
➽ बटाटे स्वस्त असतात तेव्हा तुम्ही जास्त बटाटे घेऊन साठवा. तर त्यात दोन ते तीन लसूण ठेवल्यास ते जास्त दिवस ताजे राहतील.
➽ आपण कॉफी पावडर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ते कधीही चिकट होत नाही.
➽ चिंचेवर मीठ लाऊन ठेवल्यास दीड ते दोन वर्षे त्याचा रंग आणि सुगंध तसाच राहील.
➽ घरात तूप बनवताना त्यात काही मेथीचे दाणे ठेवले तर तूप लवकर खराब होत नाही.
➽ केळीला लटकवून ठेवल्याने ते लवकर खराब होत नाहीत.
➽ काजू अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी पातळ कापडामध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. म्हणजे ते ताजे राहतील.
➽ कच्चा नारळ ताजा ठेवण्यासाठी त्यात थोड मीठ टाकून तो फ्रीजमध्ये ठेवा. तो ताजाच राहील.
➽ मिरपूडमध्ये थोडे मीठ घाला म्हणजे ते वर्षानुवर्षे खराब होनार नाही.
➽ डाळीत थोडे मीठ टाकल्यास डाळीत किडे येत नाहीत.
➽ गरम मसाल्याची चव टाळण्यासाठी एक चिमूटभर हिंग मिक्स करून त्यात टाका.
➽ जर लसूण कोरडा झाला असेल तर हलके फ्राय करा. आणि नंतर याचा मसाला म्हणून वापर करा.
➽ केक जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी, ज्यामध्ये आपण केक ठेवता त्यात सोललेली थोडी संत्री ठेवा, यामुळे केक जास्त काळ ताजा राहील.
➽ कुपीमध्ये मसालेदार पान ठेवल्यास ते जास्त काळ खराब होत नाही.
➽ भाजीपाला जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी त्यांना एका वर्तमानपत्रात लपेटून ठेवा भाजीपाला जास्त दिवस ताजा राहील.
➽ तांदळामध्ये एरंडेल तेलचे काही थेंब टाकल्यामुळे तांदूळात किडे येत नाहीत.
➽ जेव्हा लिंबू बाजारात स्वस्त असतात तेव्हा त्यांचा रस काढा आणि बाटलीमध्ये भरा. जेव्हा आपल्याला आवश्यक असेल तेव्हा वापरा.
➽ पालक स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास ते तीन ते चार दिवस ताजी राहते. वर्तमानपत्रात गुंडाळले तर बरे.