आयुर्वेदिक घरगुती उपचार — Ayurvedic Home Remedies

घसा दुखणे – दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण

पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी

कमी होते.


💜घसा खवखवणे💜


 बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला
होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि
चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून
चघळावा. हा घरगुती उपचार केल्याने  खूपच आराम पडतो.
खोकल्याची ढास येत असल्यास- आख्खा सालासकट वेलदोडा
गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे.

💜 कफ 💜


कफ झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व
मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.

💜 तोंड येणे 💜

तोंडात पुरळ – तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे.

तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात

जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी हा आयुर्वेदिक उपचार नक्की करावा. दोन

दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक,

सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्या मागे बिघडलेले पचन

हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला

की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ

कमी होण्यासही मदत मिळते.


💜 घशात जळजळ 💜

घसा बसणे- वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे.
 या उपचाराने बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या
गुळण्या करणे यामुळे घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.

💜 पाय दुखणे 💜


मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट

सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण

पाहातो. यावर हा आयुर्वेदिक घरगुती उपचार छान आहे.  पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर

हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.


💜 पोटदुखी 💜


ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते.
लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते.
अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर
तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र
गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून
त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो.


हेही वाचा 👉 आरोग्य टिप्स.. [ USEFUL HEALTH TIPS ]

💜‬ चरबी कमी करा 💜


चरबी कमी करण्यासाठी हे काही आयुर्वेदिक घरगुती उपचार नक्की करून पहा …

शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहोत.


 साहित्य : १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.


कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.


हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.

💜 फायदे 💜


 ०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.

 ०२) हाडे मजबूत होतात.

 ०३) काम करण्यास स्फूर्ती येते.

 ०४) डोळे तेजस्वी होतात.

 ०५) केसांची वाढ होते.

 ०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.

 ०७) रक्ताभिसरण चांगले होते.

 ०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.

 ०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.

 १०) बहिरेपणा दूर होतो.

 ११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.

 १२) अलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.

 १३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.

 १४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.

 १५) नपुंसकता असेल तर ती दूर होते.

१६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.

१७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.

१८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.

१९) स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.

२०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.

२१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.

२२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.

२३) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी हे आयूर्वेदिक घरगुती उपचार अतिशय फायदेशीर.


आयुर्वेदिक घरगुती उपचार -- Ayurvedic Home Remedies


💜 “पाणी पिण्याची योग्य वेळ” 💜


●  तीन ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर शरीरातील उर्जेला सक्रिय करतो.
● एक  ग्लास अंघोळ केल्यानंतर -ब्लड प्रेशर त्रास संपवतो.
● दोन ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -पचनक्रिया सुधारतो.
● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -हार्ट अटैक पासुन वाचवतो.

जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीत दुखायला लागले, हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंत जाणवत असेल.. तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो… जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेल, तर तुम्ही स्वत:ची मदत करू शकता…. जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा. प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.

दीर्घ श्वासामुळे फुप्फुसांना अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. अशा वेळी खोकत राहिल्याने   रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत चालू राहते. मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. कृपया जास्तीत जास्त लोकांना हि पोस्ट शेअर करा. का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात…..!!!

👏👏💥👏👏

Leave a comment