ठेवायचं राहून गेलं…

Whatsappवर वाचलेला हा कवितावजा लेख फार आवडला, कोणी लिहिलंय माहित नाही पण शेअर करावं असं वाटलं म्हणून..,

*ठेवायचं राहून गेलं*

ठेवायचं राहून गेलं -Whatsapse-

रेल्वे अपघात व्हायच्या आधी चाकाखाली लिंबू ठेवायचं राहून गेलं
वाचली असती लोकं कदाचित त्या अपघाताच्या कचाट्यातून


बलात्कार होणा-या स्त्रीच्या काखोटीला एखादं 
लिंबू बांधायचं राहून गेलं 
वाचली असती बिचारी त्या वासनांध नजरेतून


पुरात वाहून जाणा-या संसारात, एखाद्या टोपलीत
लिंबू ठेवायचं राहून गेलं, 
वाचली असती बिचारी त्या महापुराच्या विळख्यातून


असंच ठेवलं असतं लिंबू दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी अन् गौरी लंकेश ने आपआपल्या बुडाखाली
तर वाचले असते कदाचित धर्मांधांच्या गोळीतून
पण पुरोगामी विचारांच्या धुंदीत त्यांचं लिंबू ठेवायचं राहून गेलं


तसं ते राहिलं होतं ठेवायचं रथाखाली रावणाच्या अन् कर्णाच्याही
पृथ्वीराज चौहान अन् शंभूराजेही विसरले ठेवायला त्याला घोड्यांच्या टाचेखाली स्वारीला निघताना
उगी गर्व केला त्यांनी हातातील ताकदीवर आणि स्वत:च्या बुद्धीवर 
एका लिंबानी शत्रूची त्रेधातिरपीट उडत असतांना


त्या झाडांनीही ठेवायला हवं होतं ज्यांची रातोरात कत्तल झाली
अन् त्या निष्पाप जीवांनीही ज्यांची दिवसाढवळ्या हत्या झाली
राहिलंय तसं लिंबू ठेवायचं त्या वसुंधरेच्या माथ्यावरती
मानवी लालसेने जिला नग्न केलं आहे
चंद्रावरही ठेवावं म्हणतो एखादं
कारण उद्या त्याचाच नंबर आहे


तरूणांच्या डोक्यावर ठेवायची गरज नाही वाटत
कारण त्यांच्या डोक्यात ३७० चं लिंबू फिट आहे
तेच दूर ठेवील त्यांना बेरोजगारी महागाई अन् इतर समस्यांपासून


पण शेतात राबून हमीभाव नसल्याने फास घेणा-या माझ्या बळीराजाच्या डोक्यावर मात्र
एक लिंबू ठेवायचं राहून गेलं
      
आणं
 राहिलंच त्या बुडणार्या  बॅंकेच्या छपरांवर 
एक लिंबू ठेवायचं राहून गेलं

Leave a comment